निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम आरोपांची केली चीरफाड!

५ फेब्रुवारीला मतदान तर ८ फेब्रुवारीला मतमोजणी

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम आरोपांची केली चीरफाड!

केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने मंगळवारी (७ जानेवारी) पत्रकार परिषद घेत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या आरोपांवर उत्तर दिले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या मविआने ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये ईव्हीएम मधील छेडछाड, मतदार याद्यांमधील घोळ आणि काही मतदारसंघात ५० हजार मतदार वाढले, अशा प्रकारचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले होते. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. या लोकांच्या निवडणूका नसून ईव्हीएमच्या निवडणूक आहेत, असेही अनेकांनी म्हटल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या हस्ते होणार हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे उद्घाटन

पत्रकार हत्या: मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरचे काँग्रेसशी असलेले संबंध लपविण्याचा प्रयत्न

दिल्ली विधानसभा निवडणूक: ५ फेब्रुवारीला मतदान; ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी

अबब ! नितीन गडकरींनी करून दिला १२०० कोटींचा नफा!

राजीव कुमार म्हणाले, ईव्हीएम कधीही हॅक होऊ शकत नाही. ईव्हीएम छेडछाडचा आरोप निराधार आहे. ईव्हीएम फूलप्रूफ डिवाईस आहे, असे राजीव कुमार यांनी म्हटले. मतदानाच्या टक्केवारीत फेरफार झाल्याच्या आरोपांवर त्यांनी भाष्य केले.

विरोधकांकडून एक सवालही उपस्थित करण्यात येत होता. तो म्हणजे, सायंकाळी सहानंतर अचानक मतदानाची टक्केवारी वाढली कशी?. यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, सायंकाळी साडेसहाला जो आकडा जाहीर करण्यात येतो, त्यामध्ये मतदानाची पूर्ण टक्केवारी सांगता येण अवघड असते. अंतिम माहिती ही रात्री अकराच्या सुमारास येते. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत फेरफार केल्याच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे राजीव कुमार यांनी म्हटले.

Exit mobile version