ठाणे पालिका हद्दीतील रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलण्यात आला आहे.या पूर्वी झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांचा रंग हा काळा-पांढरा होता तो आता लाल-पांढरा करण्यात आला आहे.ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाने संयुक्तपणे हा निर्णयात घेण्यात आला आहे.
झेब्रा क्रॉसिंगच्या रंगात आता बदल करण्यात आला आहे.ठाणे परिसरात असणाऱ्या काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांऐवजी आता लाल-पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आखण्यात आल्या आहेत.ठाण्यातील तीन हात नाका या परिसरात हा रंग बदलण्यात आला आहे.प्रायोगिक तत्वावर हा पहिला बदल करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक विभाग यांच्या वतीने झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलण्यात आला आहे.
हे ही वाचा:
‘उत्तर प्रदेश, बिहारमधले हिंदीभाषिक तमिळनाडूत शौचालये स्वच्छ करतात’
‘बृजभूषण यांचा निकटवर्तीय असलो तरी मी डमी उमेदवार नाही’
‘खासदारांचा जाणुनबुजून गोंधळ’; निलंबनाबाबत राज्यसभाध्यक्ष खर्गे यांच्याशी चर्चा करणार!
इस्राइली व्यापारी जहाजावर अरबी समुद्रात ड्रोन हल्ला
या पूर्वी झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांचा रंग काळा- पांढरा होता.या रंगाच्या पट्ट्या प्रवाशांना- नागरिकांना दिसत नसल्याने हा बदल करण्यात आला आहे.या पट्ट्यां आता लाल आणि पांढऱ्या रंगाच्या केल्याने नागरिकांना स्पष्टपणे दिसणार आहेत.रस्त्यांवरील गाड्या आता झेब्रा क्रॉसिंगवर आल्यास त्यांना आता पांढऱ्या -लाल रंगाच्या पट्ट्या दिसणार आहेत.त्यामुळे चालक नियमांचे पालन करून आपल्या गाड्या योग्य ठिकाणी थांबवतील.
रस्त्यांवरील चालणाऱ्या नागरिकांना देखील याचा फायदा होणार आहे.कित्येकदा वाहन चालक नियमांचे पालन न करत झेब्रा क्रॉसिंगपुढे आपली वाहने आणून उभी करतात.त्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो.मात्र, आता झेब्रा क्रॉसिंगच्या रंगात बदल केल्यामुळे चालक आपल्या वाहनांना योग्य वेळी थांबवतील आणि नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी सोईस्करही होईल.