विमानतळावरील व्हायरल व्हिडीओनंतर नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने इंडिगोकडून मागविले उत्तर

मुंबई विमानतळालाही कारणे दाखवा नोटीस

विमानतळावरील व्हायरल व्हिडीओनंतर नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने इंडिगोकडून मागविले उत्तर

सध्या सोशल मीडियावर विमान प्रवाशांचा जेवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये इंडिगो एअरलाईन्सचे प्रवासी विमानतळावर जमिनीवर बसून जेवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यानंतर इंडिगो आणि मुंबई विमानतळ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मंगळवार, १६ जानेवारी रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाच्या नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने (BCAS) इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने नोटीस धाडून इंडिगो आणि मुंबई विमानतळाकडून १६ जानेवारीला म्हणजेच नोटीस पाठविल्याच्या दिवशीच उत्तर मागितले आहे. दिलेल्या मुदतीत उत्तर न दिल्यास आर्थिक दंडासह कार्यवाही सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई विमानतळावरील डांबरी रस्त्यावर प्रवासी जेवत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्यरात्री मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान इंडिगो कंपनीने प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली होती. एअरलाइन्सने सांगितले की, “आम्हाला १४ जानेवारी २०२४ रोजी गोवा ते दिल्ली येथे इंडिगो फ्लाइट ६ई२१९५ च्या घटनेची माहिती आहे. दिल्लीतील दृश्यमानता कमी असल्याने विमान मुंबईकडे वळवण्यात आले. आम्ही आमच्या ग्राहकांची मनापासून माफी मागतो आणि याकडे लक्ष दिलं आहे.”

हे ही वाचा:

दररोज १८ तास काम करून घडवली रामाची मूर्ती

लाल समुद्रावरील परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राकडून समितीची स्थापना!

अयोध्येने उघडला ‘गीता प्रेस’साठी नवा अध्याय!

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये जाण्यासाठी सज्ज 

गोव्याहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान ऑपरेशनल अडचणींमुळे मुंबईच्या दिशेने वळवण्यात आलं होतं. यानंतर मुंबई विमानतळावर प्रवासी जमिनीवर बसून जेवण करताना दिसले. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रात्रीची वेळ आहे, शेजारी इंडिगो एअरलाईन्सचे विमान उभे आहे आणि काही लोक विमाना जवळच जमिनीवर बसले आहेत. काहींच्या हातात फोन आहेत, काहीजण आपापसात बोलत आहेत तर काहींच्या जण जेवताना दिसत आहे.

Exit mobile version