महाराष्ट्रावर ऑमिक्रॉनचे सावट; मुख्यमंत्र्यांची बैठक

महाराष्ट्रावर ऑमिक्रॉनचे सावट; मुख्यमंत्र्यांची बैठक

कोरोनाच्या महामारीतून सावरत असतानाच पुन्हा एकदा ऑमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने दक्षिण आफ्रिकेत आणि जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरीयंट हा जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. या व्हेरीयंटच्या प्रादुर्भावामुळे भारतातही खबरदारीचे प्रयत्न सुरू असून महाराष्ट्रातही हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत आज सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. राज्यातील लसीकरणाचाही आढावा या बैठकीत घेतला जाईल. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सध्या राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात असून लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे असे सांगितले होते.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकार म्हणजे पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांच्या भोवती फिरणारे सरकार आहे’

‘ठाकरे सरकारचा कारभार, महाराष्ट्र बेजार’

कल्याणमध्ये विनापरवाना बालगृहात कोंडलेल्या मुलांची सुटका

‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल होऊ लागले असताना आता नव्या व्हेरीयंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का याकडे लक्ष लागून आहे. नुकतेच राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याबाबत चाईल्ड कोविड टास्क फोर्सकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. मात्र, आता पुन्हा या नव्या व्हेरीयंटमुळे या निर्णयावर पुन्हा विचार होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडूनही आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि प्रवासाबाबत असलेल्या निर्बंधांचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला ‘सार्स-सीओव्ही-२’चा ‘बी.१.१.५२९’ हा नवीन व्हेरीयंट वेगाने पसरत असून जगातील सर्वच देशांची झोप त्यामुळे उडाली आहे. कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रुग्ण नव्या व्हेरीयंटने बाधित आहेत का याची तपासणी सुरू आहे. बैठकीत नवे निर्बंध लागू होणार का याकडे लक्ष असणार आहे.

Exit mobile version