25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषमुख्यमंत्र्यांनी केली उद्धव ठाकरेंची पोलखोल, कोर्टाची कॉपीच दाखविली !

मुख्यमंत्र्यांनी केली उद्धव ठाकरेंची पोलखोल, कोर्टाची कॉपीच दाखविली !

शिंदे गटाकडून तपशीलवार माहिती ट्विटरवर पोस्ट

Google News Follow

Related

आमच्या भगिनींच्या अंगावर हात टाकणाऱ्या, लहान मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या कुणालाही अभय मिळणार नाही. त्यांना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी रत्नागिरीच्या सभेत बोलताना न्यायालयाच्या एका आदेशाचा दाखलाही दिला होता. बदलापूर घटनेवरून बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतेच एका प्रकरणात आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिल्याचे सांगितले. मात्र, विरोधकांनी यावर प्रशचिन्ह उपस्थित करत फेक नॅरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न केला. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यावर एसआयटी चौकशीची मागणी करत प्रश्न उपस्थित केले होते. उद्धव ठाकरेंच्या प्रश्नचिन्हावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले आहे. कोल्हापूर येथे आज पार पडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा’ कार्यक्रमात कोर्टाची कॉपी दाखवत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची बोलती बंद केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “दोन-चार महिन्यांपूर्वी पुण्याच्या मावळमध्ये एक अशी केस झाली होती. त्या केसमध्ये आरोपीला फाशी झाली होती. आता विरोधक म्हणतात, कुठली फाशी झालीच नाही, काय झालं? त्यावर एक मोठं चर्चासत्र सुरु आहे. पण मी आपल्याला सांगतो. मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आहे. तुमचा हा एकनाथ शिंदे भाऊ कधीही खोटं न बोलणारा भाऊ आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, घटना मावळची होती. मे २०२४ मध्ये तेजस दळवी याला फाशीची शिक्षा झाली. पोलिसांनी काम केलं. फास्टट्रॅक लावलं आणि तपास केला. माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मंचासमोर बसलेल्या शेकडो महिलांना कोर्टाची ऑर्डर दाखवली.

हे ही वाचा :

पोलिओग्रस्त वृद्ध दाम्पत्याला ६० लाखांना फसवले, २ लाख परत मिळाले!

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ममतांची बलात्कारविरोधी कायदा कठोर करण्याची मागणी

कोलकाता हत्याप्रकरणी सीबीआयचा सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल

उद्धव ठाकरे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट’

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून याबाबत ट्विटकरत या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. शिंदे गटाने ट्विटकरत लिहिले की, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला प्रकार मावळमध्ये घडलेला आहे. ६ वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या एका संतापजनक प्रकरणात फास्ट ट्रॅकवर न्याय देण्यात आला. याचा घटनाक्रम खालील प्रमाणे, गुन्ह्याची तारीख – ०२/०८/२०२२, एफआयआर दाखल करण्यात आलेली तारीख – ०२/०८/२०२२, गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली तारीख – ०३/०८/२०२२, आरोप पत्र दाखल करण्यात आलेली तारीख – १२/०९/२०२२, तपास पूर्ण – एफआयआर दाखल झाल्यानंतर ४० दिवसात, आरोपपत्र दाखल करण्यात आले – १६ / ३ / २०२३ ( ६ महिन्यांत), आरोपनिश्चिती झाल्यानंतर दोन महिन्यात साक्षी पुराव्यांची तपासणी सुरू – १२ / ०५ / २०२३
निर्णयाची तारीख – २२ /०३ / २०२४

जलदगतीने चालवण्यात आलेल्या खटल्यात आरोपी तेजस दळवीला चार महिन्यांपूर्वी पुणे न्यायलयाने फाशी सुनावली आहे. महायुती सरकारच्या काळात गुन्हेगाराला अभय नाही. आमच्या बहिणी लाडक्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या सुरक्षेशी तडजोड कदापि मान्य होणार नाही. अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही म्हणजे नाहीच. विरोधकांनी दुर्दैवी प्रकरणाचे राजकारण करणे थांबवावे. न्यायासाठी पाठीशी उभे राहावे. राजकारण होतच राहील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा