साताऱ्याच्या ‘चंदन वंदन गडावर’ही मजार, दर्गा !

गडावरील वाढलेल्या अतिक्रमणाचा व्हिडिओ समोर, शिवभक्तांकडून संताप

साताऱ्याच्या ‘चंदन वंदन गडावर’ही मजार, दर्गा !

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात बांधलेल्या आणि मुघलांकडून जिंकलेल्या गडकिल्ल्यांची अवस्था आज फार वाईट झाली आहे. महाराजांच्या अनेक गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. अनेक गडकिल्ल्यांवर दर्गे बांधून त्याचे मशिदीत रूपांतर करण्याचे काम चालू आहे. तसाच प्रकार साताऱ्यातील ‘चंदन वंदन गडावर’ती दिसून आला आहे. एकेकाळी भगव्या ध्वजांनी नटलेला हा किल्ला आज हिरव्या अतिक्रमणाने झाकला गेला आहे.

काही शिवभक्त ट्रेकिंगसाठी साताऱ्याच्या ‘चंदन वंदन गडा’वर गेले असता ही बाब समोर दिसून आली. याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. यामध्ये गडावर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. दर्गे देखील बांधल्याचे समोर दिसून आले. यावरून ट्रेकर्सनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे शिवभक्तांनी गडावर पाच झाडे लावण्यासाठी एक ठिकाण शोधून खोदकाम केले असता त्या ठिकाणी शिवलिंग सापडले. ज्या ठिकाणी आमच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्तामासाचा चिखल केला त्या ठिकाणी आमचे हिंदू देवतांचे शिवलिंग गाडले जात आहे. एकेकाळी छत्रपती शिवाजी या शिवलिंगावर नतमस्तक झाले असतील आणि ते आज गाडण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे महाराजांचा इतिहास, महाराजांच्याच राज्यात पुसण्याचं काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा:

पोटनिवडणुकात विरोधकांनी आपल्या जागा राखल्या, भाजपाला हरवले नाही!

‘विशाळ गड’ घेणार मुक्त श्वास, कारवाईला उद्यापासून सुरुवात !

मणिपूरच्या जिरीबाममध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान हुतात्मा !

काँग्रेस नेत्याने पसरवली खोटी बातमी

दरम्यान, राज्यातील अशा अनेक गड किल्ल्यांवर अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण पाडण्यासाठी राज्यातील विविध हिंदू संघटना आणि शिवभक्त प्रयत्न करत आहेत.

Exit mobile version