अपघातावेळी गाडीचं स्टीयरिंग वेदांतच्या हाती!

पुणे अपघात केसमध्ये ड्रायव्हरचा जबाब

अपघातावेळी गाडीचं स्टीयरिंग वेदांतच्या हाती!

पुणे अपघात प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरने पुणे पोलिसांना जबाब दिला आहे.गाडी वेदांत अग्रवालच चालवत होता, अपघात झाला त्यावेळी गाडीचं स्टीयरिंग त्याच्याच हातामध्ये होत, असे ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले आहे.जेव्हा अपघात झाला तेव्हा मी आरोपी वेदांत अग्रवालच्या बाजूला बसलो होतो, असे ड्रायव्हरने पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

पुणे अपघात प्रकरणी आरोपी वेदांत अग्रवालला १४ दिवसांसाठी बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.तसेच आरोपी विशाल अग्रवाल याची चौकशी सुरु आहे.यासह विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे.या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत.दरम्यान, ज्या वेळी ही दुर्घटना घडली तेव्हा आरोपी वेदांत अग्रवालच्या शेजारी पोर्शे गाडीचा ड्रायव्हर हा सुद्धा उपस्थित होता.पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता जेव्हा घटना घडली तेव्हा गाडीचे स्टीयरिंग वेंदातच्या हाती असल्याची कबुली दिली आहे.

हे ही वाचा:

अरविंद केजरीवाल यांच्याकडून बिभव कुमारचा बचाव; हल्ल्याच्या वेळी ते घरीच होते

डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणातील फरार कंपनी मालकास अटक!

अभिनेत्री लैला खान हत्याकांड प्रकरणी सावत्र पित्याला फाशी

बांगलादेशी खासदाराच्या शरीराचे तुकडे केले, सुटकेसमध्ये भरले…खुन्याला अटक

गंगाराम पुजारी असे ड्रायव्हरचे नाव आहे.पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कसून चौकशी केली असता ही बाब समोर आली.या प्रकरणी ड्रायव्हरचा जबाब अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.जेव्हा घटना घडली तेव्हा मी गाडी चालवत न्हवतो तेव्हा वेदांत गाडी चालवत असल्याचे ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले.या संदर्भात त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनाही माहिती होती.मी शेजारी बसलो होतो, असे ड्रायव्हर गंगाराम पुजारीने पोलिसांना सांगितले.

Exit mobile version