वऱ्हाड घेऊन जाणारी बस ताम्हिणी घाटात पलटली; पाच जणांचा मृत्यू

खाजगी बस चाकण येथून महाडला लग्नासाठी जात असताना घडला अपघात

वऱ्हाड घेऊन जाणारी बस ताम्हिणी घाटात पलटली; पाच जणांचा मृत्यू

रायगडच्या ताम्हिणी घाटात एका खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून पाच जण ठार झाल्याची माहिती असून २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही खाजगी बस चाकण येथून महाडला लग्नासाठी जात असताना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये ४० च्या आसपास प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळून जात असताना या खाजगी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत पाच जण जागीच ठार झाले तर २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड) लग्नासाठी वऱ्हाड घेऊन जात होती. ठार झालेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा पवार, वंदना जाधव अशी मृतांची नावे असून एका पुरुषाचे नाव अजून समजलेले नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली.

हे ही वाचा: 

सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार!

जयपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट, ८ जणांचा होरपळून मृत्यू!

‘नीलकमल’च्या अपघातानंतर जाग; बोट प्रवासासाठी लाइफ जॅकेट अनिवार्य!

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर मानवी चुकीमुळे कोसळले!

Exit mobile version