27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमुुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका आज रविवारी; मुंबई उच्च न्यायालयाने दिला आदेश

मुुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका आज रविवारी; मुंबई उच्च न्यायालयाने दिला आदेश

निवडणुकीत मतदारांची संख्या १३,४०६ एवढी सांगण्यात आहे. तरी कमी वेळात निवडणुकीचं व्यवस्थापन करणं विद्यापीठासाठी तारेवरची कसरत ठरणार आहे.

Google News Follow

Related

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूका २२ सप्टेंबरला ठरलेल्या असताना त्यावर मुंबई विद्यापीठाने स्थगिती आणल्यानंतर पदवीधर विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध केला. विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन छेडले होते. तर उबाठा गटाच्या युवासेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत मुंबई उच्च न्यायालयाने सिनेटच्या निवडणुका रविवारी २२ सप्टेंबरलाच घेण्याचा निर्णय दिला आहे.

न्यायमूर्ती आशिष चांदोरकरांच्या चेंबरमध्ये विद्यापीठाने मंगळवारी निवडणूका घेण्याची विनंती केली होती. कमी वेळात निवडणूक घेता येणं शक्य नसल्याचा दावा करत निवडणूका पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली. ज्यावर पूर्णपणे दुर्लक्ष करत कोर्टाने सिनेटच्या निवडणूक रविवारीच घेण्याचे आदेश दिले आहेत. तर सिद्धार्थ मेहता यांनी उबाठाच्या बाजूने दावे मांडले होते.

हे ही वाचा:

आमदार अतुल भातखळकरांनी दिले लक्ष्मीच्या पंखांना बळ!

पटना NIT मध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वातावरण गढूळ, विद्यार्थ्यांनी पुकारले आंदोलन!

अंबानींचा ‘अँटिलिया’ वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधला आहे: फरार आरोपी झाकीर नाईक!

मुंबई विद्यापीठाच्या १० जागांसाठी येत्या रविवारी निवडणूका घेण्यात येणार होत्या विविध कारणं पुढे करत स्थगिती आणली होती. यापूर्वी देखील विद्यापीठाने अशाचप्रकारे निवडणुका पुढे ढकलल्याने मतदार विद्यार्थ्यांत तीव्र संताप होता.  २२ सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी विद्यापीठाने १९ तारखेला परिपत्रक काढलं होतं. त्यावर आक्षेप घेत उबाठा गटाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने निर्णय देत विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लावला आहे. त्यामुळे आता रविवारीच विद्यापीठाच्या निवडणूक घेण्यात येतील असं जाहीर करण्यात आलं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या १० जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. त्यासाठी विद्यापीठ परिक्षेत्रात ३८ मतदान केंद्रांवर ६४ बुथची व्यवस्था केली जाणार आहे. निवडणुकीत मतदारांची संख्या १३,४०६ एवढी सांगण्यात आहे. तरी कमी वेळात निवडणुकीचं व्यवस्थापन करणं विद्यापीठासाठी तारेवरची कसरत ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा