छत्रपती संभाजीनगर – मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला.तसेच केंद्र सरकारकडूनही या निर्णयाला मान्यता मिळाली असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यात आले.
पण आता याच प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. औरंगाबादचं (Aurangabad) छत्रपती संभाजीनगर असं नामांतरण करण्यात आलं असलं तरी नामांतराबाबत अंतिम अधिसूचना अद्याप आलेली नाही. पण त्याआधीच सरकारी कागदपत्र आणि दस्तऐवजांवर औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) असा उल्लेख करण्यात येतोय. याच गोष्टीला मुंबई उच्च न्यायालयात विरोध करण्यात आलाय. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा या प्रकरणी थेट सरकारला निर्देश दिले आहेत.टपाल कार्यालयं, महसूल, स्थानिक पोलीस, न्यायालयं इथं संभाजीनगरचा उल्लेख सुरू झाल्याची याचिकाकर्त्यांकडून मुंबई उच्च न्यायालयात तक्रार करण्यात आली होती.
हे ही वाचा:
गावातील लोकांमध्ये फूट पाडून राजकीय पक्षांनी आपली दुकाने चालवली
भूकंपाच्या धक्क्याने मेघालय हादरले
अश्लील रॅप गाण्याच्या चित्रीकरणाच्या विरोधात अभाविपची पुणे विद्यापीठात जोरदार निदर्शने
हिजाबपेक्षा शिक्षणाला महत्व देत कर्नाटकची तबस्सुम शेख पीयूसी परीक्षेत टॉपर
या तक्रारीची दखल उच्च न्यायालयाने घेत सरकारला निर्देश दिले आहेत.नामांतराबाबत अंतिम अधिसूचना येत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.मुस्लिम बहुल विभागांत नावं तातडीनं बदलण्याची जणू मोहिमच हाती घेतल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी कोर्टात केला आहे. या प्रकरणी न्यालयाच्या आदेशानंतर उस्मानाबाद प्रमाणेच औरंगाबादमध्येही तसेच निर्देश जारी करू, अशी ग्वाही राज्य महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. दरम्यान, औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरील याचिकेवरील सुनावणी ७जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही ७ जून रोजी होणार आहे.
उस्मानाबाद बद्दलही तेच आदेश –
उस्मानाबाद जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असे आदेश उच्च न्यायालयने दिले आहेत. यासंदर्भात पुढील सुनावणी ६ जून रोजी होणार आहे. पण १0 जूनपर्यंत उस्मानाबाद हे नाव वापरा, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.महसूल आणि जिल्हा परिषद विभागाकडून उस्मानाबाद जिल्ह्याचे तसेच तालुक्याचे नाव धाराशिव असे वापरले जात होते. त्याबाबतचे पुरावे व प्रशासकीय पत्रव्यवहार कोर्टात सादर करण्यात आला. त्यानंतर कोर्टाने सूचना केल्या. म्हणजे सध्या फक्त शहराचे नाव धाराशिव वापरता येणार आहे. जिल्हा आणि तालुक्याचे नाव उस्मानाबाद असणार आहे. यावर पुढील सुनावणी १0 जूनपर्यंत होणार आहे.
नामांतर विरोधी आंदोलकांचे साखळी उपोषण की बिर्याणी पार्टी ?
खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी साखळी उपोषणाची घोषणा केली होती. मात्र एमआयएमच्या साखळी उपोषणादरम्यान काही कार्यकर्त्यांनी बिर्याणीवर ताव मारल्याची बातमी समोर आली होती. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ समोर आला होता.त्यामुळे शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) नेते आक्रमक होऊन इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका करण्यात आली होती.बिर्याणी पार्टी बद्दल खासदार इम्तियाज जलील याना विचारले असता त्यांनी अतिशय मजेशीर उत्तरं देत म्हणाले बिर्याणी खाल्ली तर काही गुन्हा केला का? मला फासावर लटकवणार का? असे प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले.त्यादिवशी खूप चांगली बिर्याणी झाली होती. बिर्याणीसाठी मटनही खूप चांगलं आणलं होतं असेही इम्तियाज जलील म्हणाले.