घराजवळ खेळता खेळता अचानक बेपत्ता झालेल्या ५ आणि ४ वर्षाच्या दोन सख्ख्या भावांचे मृतदेह वडाळा येथील मनपा गार्डनमधील पाण्याच्या टाकीत आढळून आले आहे. या दोन्ही भावांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मुंबई महानगर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी रफी किडवाई मार्ग पोलीसानी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
अंकुश मनोज वाघरी (५ वर्षे ४महिने) आणि अर्जुन मनोज वाघरी (४वर्षे ३महिने) असे मृत्यू झालेल्या दोन्ही भांवाची नावे आहेत. मनोज वाघरी हे पत्नी आणि पाच मुलांसह वडाळा सुभाष नगर येथे राहण्यास आहे. मनोज वाघरी यांची दोन मुले अंकुश आणि अर्जुन हे दोघे रविवारी सकाळी घराजवळ असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या ‘वन गार्डन’च्या भिंती लागत खेळत होते.बराच वेळ झाला मुले घरी परतली नसल्यामुळे मनोज वाघरी यांची पत्नीने मुलाचा शोध घेतला परंतु दोघेही मिळून आले नाही. पत्नीने मुले सापडत नसल्यामुळे पती मनोजला कळवले. पती पत्नी दोघांनी संपूर्ण परिसर शोधला परंतु मुले सापडली नाहीत.
माटुंगा पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, माटुंगा पोलिसांनी मुले अल्पवयीन असल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलांचा शोध सुरू केला. रविवारी दिवसरात्र शोध घेऊन ही मुले मिळून येत नसल्यामुळे कुटुंब चिंतेत होते. सोमवारी सकाळी पुन्हा मुलांचा शोध घेत असताना वन गार्डन येथील उघड्या पाण्याच्या टाकीत दोन मुलाचे मृतदेह रफी अहमद किडवाई मार्ग पोलीसांना आढळले.
हे ही वाचा:
शाळेत ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय श्री राम’ बोलल्यामुळे विद्यार्थिनीला शिक्षा
इक्बाल सिंग चहल यांना हटविण्याचे आदेश
अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावल्यामुळे दुकानदाराला मारहाण!
चोरट्याने आधी मंदिरात केली देवपूजा, नंतर केली हातसफाई!
पोलिसांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटवली असता दोन्ही मृतदेह अंकुश आणि अर्जुन या दोन भांवंडांची असल्याची ओळख पटली. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी प्राथमिक तपासावरून अपमृत्यूची नोंद करून दोन्ही मृतदेह केईएम रुग्णालय येथे पूर्व तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वन गार्डन हे मनपाचे गार्डन असून ते गार्डन रफी किडवाई मार्ग पोलिसांच्या हद्दीत आहे. गार्डनमध्ये खूप जुनी जमिनीत पाण्याची मोठी टाकी असून त्या टाकीचा झाकणे उघडी होती, त्याच्यावर काळ्या रंगाचे प्लास्टिक टाकण्यात आले होते, मुले खेळता खेळता या पाण्याच्या टाकीत पडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.पाण्याच्या टाकीवर झाकणे नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असून याला सर्वस्वी मुंबई महानगर पालिकेचे संबंधित अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.