वेंगुर्ला बोट दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले!

मृतांमध्ये तीन मध्यप्रदेशचे तर एक जण रत्नागिरीचा

वेंगुर्ला बोट दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले!

सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात दोनदिवसांपूर्वी रात्री बोट पलटून सात जण बुडाले होते.यापैकी तिघांनी पोहून किनारा गाठला, तर चौघे जण बेपत्ता होते.यापैकी दोघांचे काल मृतदेह सापडले तर अन्य दोघे बेपत्ता होते.दरम्यान, बेपत्ता असणाऱ्या दोघांचेही मृत्यूदेह सापडले आहेत.वादळी वाऱ्यामुळे ही दुर्घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बोट उलटून मृत झालेल्या चार पैकी तीन मध्यप्रदेशचे तर एक जण रत्नागिरी मधील खलाशी आहे.आझाद मुनीलाल कोल, चांद गुलाल महमद, शिवराम कोल हे तिघे मध्य प्रदेश मधील तर महादेव शंकर आंबेरकर हा मूळचा रत्नागिरीचा होता.हे सर्व खलाशी वेंगुर्ले येथे मासेमारी बोटीवर कामाला होते.या पैकी दोघांचे मृतदेह काल होते तर आज दोघांचे मृतदेह मिळाले.

हे ही वाचा:

छत्तीसगडमध्ये गन पावडरच्या कारखान्यात स्फोट; १२ जणांचा मृत्यू

‘काँग्रेसला गरीबी, संकटग्रस्त भारत आवडतो’

पोर्शे अपघाताची माहिती वरिष्ठांना वेळेत न दिल्याने पुण्यातील दोन पोलिसांचे निलंबन!

‘नवीन पटनायक यांना व्हीके पांडियन यांनी ओलिस ठेवले आहे’

बुधवारी (२३ मे) रात्री ही घटना घडली होती.मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन बोट घऊन जात असताना बोट उलटली.बोटीतील सातही खलाशी बुडाले.यापैकी तिघांनी पोहून किनारा गाठला, तर चौघे जण बेपत्ता होते.यापैकी दोघांचे मृतदेह सापडले होते तर अन्य दोघेजण बेपत्ता होते.बेपत्ता खलाशांचा शोध सुरू होता.

Exit mobile version