संकटकाळात काय करायचं हे बोट चालकाने सांगितलं नाही!

अपघातानंतर वाचलेल्यांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी फेरीवर तयारी नसल्याबद्दल व्यक्त केला संताप

संकटकाळात काय करायचं हे बोट चालकाने सांगितलं नाही!

“मी वेळेवर लाईफ जॅकेट घालण्यात यशस्वी झालो पण, इतर तीन ते चार जण मला चिकटून होते. इतका काळ तरंगत राहणे कठीण झाले होते. नंतर मला पाण्यात एक क्रेट सापडला आणि त्याच्या आधारे थोडा वेळ तरंगत राहता आले,” असे कुर्ला येथील रहिवासी जीतू जे मुंबईतील फेरी अपघताच्या वेळी ‘नीलकमल’ बोटीतून प्रवास करत होते त्यांनी सांगितले. मदत येईपर्यंत जीतू चौधरी तरंगत राहण्यात यशस्वी झाले. त्यांनी सांगितले की, स्वतः त्यांनी सात- आठ लोकांना लाइफ जॅकेट घालायला मदत केली परंतु, जहाजावरील सर्वांसाठी लाइफ जॅकेट पुरेसे नव्हते. गेटवे ऑफ इंडियाजवळ घडलेल्या या अपघातानंतर बहुतेक वाचलेल्यांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी फेरी बोटीवर योग्य तयारी नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.

“आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे लागेल याची कोणालाच कल्पना नव्हती. संपूर्ण गोंधळ होता. बोट चालकाकडून कोणतीही सूचना येत नव्हती. ज्यांनी लाइफ जॅकेट घातले होते त्यांनी पाण्यात उडी मारणे अपेक्षित होते. परंतु, ते सर्वजण बोटीवर धावत राहिले. सुरुवातीलाचं ड्रायव्हरने लोकांना छतावर (डेकवर) ५० रुपयांत बसू दिले. यानंतर अपघातादरम्यान खाली आल्यावर त्यांच्यापैकी अनेकांना लाइफ जॅकेट मिळू शकले नाहीत,” असे कर्नाटकातील कुशलनगर येथील त्यांच्या तीन मित्रांसह असलेले सिंग म्हणाले. “मला थोडं पोहणं माहित होतं, पण अशा परिस्थितीत त्याचा काही उपयोग झाला नाही,” असेही ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा : 

४६ वर्षांनंतर उघडण्यात आलेल्या संभलच्या मंदिराचे एएसआयकडून सर्वेक्षण!

सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घरावर बुलडोजर, पायऱ्या तोडल्या!

कल्याणमधील मराठी माणसावर हल्ला प्रकरणी अखिलेश शुक्ला निलंबित

तलवारीचा नंगानाच करत धमकावणाऱ्या फजल आणि समीरला पोलिसांनी ठोकले!

जीतू चौधरी यांनी नौदलाची स्पीड बोट फेरी बोटवर धडकल्याचा क्षण आठवला. “काही जण व्हिडिओ शूट करत होते, काही रील बनवत होते. सुरुवातीला टक्कर झाल्यामुळे बोटीला छिद्र पडल्याचे कोणालाच कळले नाही. लोकांनी खरेतर प्रवास सुरू करण्यापूर्वी लाइफ जॅकेट घालणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत ते घालणे खूप अवघड आहे. घाबरून जाण्यामुळे बरेच लोक यासाठी झगडत होते,” असेही ते पुढे म्हणाले. या अपघातातून बचावलेले जोशुआ फर्नांडो म्हणाले की, पुरेशी लाइफ जॅकेट्स आहेत, पण त्यांचे वितरण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. लाइफ जॅकेट असलेले लोकही घाबरले होते.”

Exit mobile version