भोपाळच्या स्वतंत्र विचारांच्या हिंदू कुटूंबात वाढलेला सौरभ आता सलीम झाला आहे. मध्य प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने नुकतीच हिजब उत तेहरीर या दहशतवादी गटाशी संबंध असण्यावरून १६ जणांना अटक केली, त्यात हा सौरभ उर्फ मोहम्मद सलीम होता. त्याचे वडील अशोक राज यांनी ऐकवला त्याचा धर्मांतरण ते दहशतवाद असा झालेला भयंकर प्रवास.
अशोक राज यांचे कुटूंब स्वतंत्र विचारांचे होते. कोणत्याही धर्मात विवाह करण्यास त्यांचा आपल्या मुलांना पूर्ण पाठींबा होता, पण त्यातच त्यांच्या मुलाने हळूहळू इस्लाम स्वीकारण्यास सुरुवात केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याची पत्नीही हिजाब परिधान करू लागली. ए एन आय या वृत्तसंस्थेला त्यांनी ही कहाणी ऐकवली.
ते म्हणतात २०११मध्ये मला प्रथम सौरभमध्ये हे बदल दिसले. तो आमच्या कौटूंबिक कार्यक्रम, सोहळे, सण समारंभ यापासून दूर राहू लागला. त्याची पत्नीही इस्लामिक वेष परिधान करू लागले. मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रयत्न अपयशी ठरले.
पेशाने वैद्य असलेले अशोक राज म्हणाले की, आम्ही याबाबत पोलिसांना कळवले पण त्याने स्वतःहून धर्म स्वीकारल्यामुळे त्यात त्यांनी लक्ष घातले नाही. सौरभच्या संपर्कात एक डॉ. कमाल म्हणून होता त्याने सौरभला इस्लामकडे वळवल्याचा संशय आहे. नंतर लक्षात आले की डॉ. कमाल हा झाकीर नाईकचा एजंट आहे आणि त्यानेच सौरभला इस्लामिक प्रार्थना सांगितल्या.
वैद्य म्हणाले की आम्ही तेव्हाच्या काँग्रेस सरकारला पत्र लिहून आवाहन केले होते की झाकीर नाईकची भाषणे त्यांनी बंद करावीत. आम्हाला विश्वास आहे की सौरभ कोणत्याही दहशतवादी कृत्यात सामील नाही पण त्याने इस्लाम सोडला तरच त्याला आम्ही घरात प्रवेश देऊ, अन्यथा नाही.
हे ही वाचा:
त्या २६ मुलींचे आयुष्य ‘द केरळ स्टोरी’सारखेच
एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे याचं निधन !
नाद एकच; बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील !
‘द केरळ स्टोरी’ बंगालमध्ये प्रदर्शित होणार
सौरभच्या आई वासंती म्हणाल्या की, आता आमची नातवंडेही मदरशात शिक्षण घेतात. सौरभच्या भोवती नेहमीच मुस्लिम मित्रांचा गराडा असे. मी त्या मित्रांशी वाद घातला नाही कारण मला भीती होती त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर? त्याला अटक होण्यापूर्वी मी त्याच्याशी बोलले, पण नंतर त्याचा फोन लागत नव्हता. मग सुनेने मला सांगितले की तो बाहेर असल्यामुळे फोन बंद आहे. तेव्हा मला संशय आला. पण नंतर बातमी कळली त्याला अटक झाल्याची.