27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषहरवलेल्या सामानासाठी आता शुल्क भरण्याचा 'बेस्ट' उपाय

हरवलेल्या सामानासाठी आता शुल्क भरण्याचा ‘बेस्ट’ उपाय

बेस्ट बसमध्ये हरवलेल्या अथवा विसरलेल्या वस्तूंवर दावा करण्यासाठी भरावे लागणार इतके शुल्क

Google News Follow

Related

मुंबई बेस्ट बसमध्ये सामन विसरलात किंवा रोखरक्कम विसरलात तर काळजी करू नका. बेस्टचे वडाळा येथील ‘हरवले सापडले’ केंद्रातुन पुन्हा मिळवू शकता. पण त्यासाठी नव्या नियमांनुसार रोख रक्कमवर १४% शुल्क आकारण्यात येथे तर बॅग किंवा मोबाईल यासारख्या इतर वस्तूंवर ५० रुपये प्रति वस्तूमागेएवढी नाम मात्र शुल्क आकारले जाणार आहे. तर तर बेस्ट तर्फे चालू करण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत आता पर्यंत बेस्ट बसमध्ये हरवलेल्या अथवा विसरून गेलेल्या रोख रकमेची किंमत ही २४ लाख ५० हजार असून आता पर्यंत फक्त १० लाख ७० हजार रुपयांच्या रकमेवर आतापर्यंत प्रवाशांनी आत पर्यंत दावा केला आहे.

बेस्टच्या वडाळा येथील ‘हरवले सापडले’ केंद्रात हरवलेल्या वस्तूंमध्ये सोने,चांदी, हिऱ्यांचे दागिने यासारख्या मौल्यवान वस्तूंवर वेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच बेस्ट बसमध्ये हरवलेली रक्कम जवळच्या डेपोमध्ये जमा केल्यावर तीन दिवसाच्या आता रक्कम घेसल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु एकदा ती वस्तू किंवा रक्कम वडाळा येथील ‘हरवले सापडले केंद्रात गेले असता, संपूर्ण शुल्क भरून त्या वस्तूवर दावा करता येऊ शकतो. असे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेस्टच्या ताज्या आकडेवारीनुसार दिसून येते की, १३३ सोन्याचे, चांदीचे आणि हिऱ्यांचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम असे एकूण मिळून २७ लाख रुपयांचे ऐवज महामारीच्या कळात प्रवासी बेस्ट बसमध्ये विसरून गेल्याचे दिसून येते, तर त्यामध्ये ४३ टक्के रोख आणि काही मोबाईलवर प्रवाशांनी दावा केला असून, उर्वरित रोख रक्कम आणि वस्तू अजूनही वडाळा येथील केंद्रात आहे. तर गेल्या दशकभरात बेस्ट बसमध्ये १ कोटी रुपयांचे मौल्यवान वस्तू आणि रक्कम बस गाड्यांमध्ये गमावल्याचे बेस्टने सांगितले.

हे ही वाचा:

सितरंग चक्रीवादळाचा कहर, बांगलादेशात ७ जणांचा मृत्यू

जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

याशिवाय हरवलेल्या सामानापैकी कंडक्टरकडे २००० हजार मोबाईल फोन, २०० हुन अधिक ब्रँडेड घड्याळे, पेन ड्राइव्ह, मोबाईल पॉवर बँक, लॅपटॉप इत्यादी वस्तू आणि कपडे, भांडी पिशव्या आणि चष्मा यासारख्या ३ हजार २०० हुन अधिक विविध वस्तूंचा समावेश आहे. तसेच २०२० ते २०२१ या वर्षात पावसाळ्यात जवळपास ७ हजार छत्र्या वडाळा येथील हरवले-सापडेल केंद्रात जमा केल्या आहेत. त्यात फक्त २१५ प्रवाशांनी छत्र्यांवर दावा केला आहे. तसेच या केंद्रात १ ते २ महिन्यासाठी मोबाईल ठेवले जातात तर उर्वरित मोबाईलवर दावा न केल्यास ओशिवरा स्थानकात लिलावात विकले जातात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा