नव्या संसद भवनाच्या सौंदर्याला परंपरा, संस्कृतीची झालर

नव्या संसद भवनाच्या या वास्तूत देशाच्या विविध भागांतील शिल्पे आणि कलाकृती

नव्या संसद भवनाच्या सौंदर्याला परंपरा, संस्कृतीची झालर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे रोजी आपल्या ट्विटर हँडलवरून संसदेच्या नव्या इमारतीचा व्हिडिओ शेअर केला होता. १.४८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये संसदेचे सौंदर्य आणि भव्यता पाहायला मिळते.

नव्या संसद भवनाच्या या वास्तूत देशाच्या विविध भागांतील शिल्पे आणि कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय गरुड, गज, घोडा, मगर यांसह देशभरात पुजल्या जाणाऱ्या प्राण्यांची झलकही पाहायला मिळाली. याशिवाय इमारतीत तीन दरवाजे बांधण्यात आले असून त्यांची नावे ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी ठेवण्यात आली आहेत. या इमारतीत भारताचा आधुनिक होण्यापर्यंतचा प्रवासही पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

फडणवीस म्हणाले, शहरी नक्षलवाद्यांची विद्यापीठांमध्ये घुसखोरी

‘आशिष विद्यार्थीने माझी कधीही फसवणूक केली नाही’

शिवसेना पदाधिकारी शब्बीर शेखची भोसकून हत्या

डेंग्युच्या अळ्या सापडल्यामुळे १२० सोसायट्यांवर दाखल केले गुन्हे

या इमारतीत भव्य संविधान सभागृह, लाउंज, ग्रंथालय, डायनिंग हॉल आणि पार्किंगची जागा असेल. एक भारत श्रेष्ठ भारताची खरी भावना प्रतिबिंबित करणाऱ्या लोकशाहीच्या मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून अनोखे साहित्य गोळा करण्यात आले आहे.

 

Exit mobile version