मुंबईच्या समुद्रकिनारी एक धक्कादायक गोष्ट आढळून आली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना मोठा धक्का बसला होता. यामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यच नष्ट झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर तेलाचा तवंग आढळून आला होता. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर काळ्या रंगाचे पट्टे देखील उठले होते. मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना यामुळे धक्का बसला होता. काही नागरिकांनी याबाबत ट्वीट देखील केले.
दादर चौपाटीवर तेलाचा तवंग वाहून आला आहे चौपाटीवर एक दोन किमीपर्यंत वाळूवर टार बॉल पसरले आहे चौपाटी आणि प्रदूषित झाले आहे. जुहु चौपाटीवरही असाच तेलाचा तवंग पसरला आहे @SaamanaOnline @MCGM_BMC @mybmcWardGN @mybmcWardGS @KishoriPednekar @AUThackeray @CMOMaharashtra #pollution pic.twitter.com/8FbcBxEUFj
— Rajesh Chury (@rajeshvchury) August 7, 2021
मुंबईच्या दादर चौपाटीवर डांबराचे काही गोळे देखील आढळून आले होते. त्याबरोबरच लोकप्रिय जुहू चौपाटीवर देखील अशाच प्रकारचा तवंग आढळून आला होता. तेथील वाळू देखील खराब झाली होती. या तेलाच्या तवंगामुळे किनाऱ्यावरील जैवविविधता धोक्यात आल्याचे देखील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. समुद्र किनाऱ्यावर ५ ते ८ किलोमीटर पर्यंत तेलाचा तवंग वाहून आला होता. समुद्र किनाऱ्याची शोभा घालवणाऱ्या या तेलाच्या तवंगाचा उगम मात्र समजू शकलेला नाही.
हे ही वाचा:
कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार
…म्हणून तेजस ठाकरेंची व्हिव्हियन रिचर्ड्स सोबत तुलना! नार्वेकरांचा खुलासा
राहुल गांधींचा ‘हा’ प्रयत्न ठरला फोल
जम्मू- काश्मिरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
तेलाच्या तवंगामुळे समुद्री जैवविविधतेला धोका निर्माण होतो. ती चिंता स्थानिकांकडून देखील व्यक्त केली जात आहे. यापूर्वी देखील मुंबईच्या किनाऱ्यावर अशाच प्रकारचा तेलाचा तवंग आढळला होता. सध्याच्या तेलाच्या तवंगाचा उगम मात्र अजूनही गुढ आहे.
नागरिकांनी ट्वीट केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या ट्वीटर हँडलवरून लगेच याची दखल घेण्यात आली होती. महानगरपालिकेने याबाबत दखल घेत समुद्रकिनाऱ्याची सफाई केल्याचे देखील सांगितले होते. त्याबाबतची छायाचित्रे देखील महानगरपालिकेकडून ट्वीट करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही समुद्रातील तेलाचा तवंग गेला असल्याबाबत नक्की माहिती मिळू शकलेली नाही.