बदलापूरमध्ये चार वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचार विरोधात आरोपीला फाशीच्या शिक्षेच्या मागणी करिता पालकांनी आणि नागरिकांनी शाळेसमोर, बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोपीला शिक्षा होईल असे आश्वसन दिले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आंदोलकांची भेट घेऊन आरोपीला कठोरातील-कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले. याचवेळी भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार असल्याचे म्हटले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, बदलापुरात शाळेमध्ये चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे. मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या कुटुंबावर काय संकट कोसळले असेल, याची कल्पना करू शकते. या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही. राज्याचे गृहमंत्री आणि गृहखाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल, तशा सूचना पोलीस खात्याला दिल्या गेल्या आहेत. या हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार…
त्या पुढे म्हणाल्या, या घटनेत २ तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रस्ता रोको, रेल रोको सारखी आंदोलने सुरू झाली आहेत. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गृह खाते ‘अलर्ट मोड’वर आहे. गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सुचना ही दिल्याहेत.
हे ही वाचा..
मिरारोडमधून पाच बांगलादेशी महिलांना घेतले ताब्यात
‘आसाममध्ये ‘ती’ घटना घडली असती तर त्वरित न्याय झाला असता!’
बदलापूरप्रकरणात राजकारण करू नका
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन
या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आहेत समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चालली असून काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवावे. तसेच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहण्याची विंनती चित्रा वाघ यांनी केली आहे.
बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार…!
बदलापुरात शाळेमध्ये चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे. मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या कुटुंबावर काय संकट कोसळले असेल, याची कल्पना करू शकते.
या प्रकरणातील आरोपी… pic.twitter.com/chEN5jQTeB
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 20, 2024