संपूर्ण देश स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करत असताना मुंब्र्यातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंब्रा येथे काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये टिपू सुलतानचे बॅनर झळकल्याचे समोर आले आहे. मागच्या काही वर्षात टिपू सुलतान या नावावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये अनेकदा वाद झाला आहे. टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावरून देखील अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी मालाड येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव द्यायला भाजपाने विरोध केला होता. याच टिपू सुलतानच्या फोटोवरुन आता पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या खाजगी संघटनेच्या वतीने मुंब्र्यात तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये प्रत्येक महापुरुषांच्या फोटोसह टिपू सुलतानचाही फोटो लावण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी ही रॅली थांबवून टिपू सुलतानचे पोस्टर असलेले फलक काढायला सांगितले. मात्र, मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वाद घालत पोस्टर का काढावे?, असा सवाल उपस्थित केला. पोलिसांनी सांगून देखील या मुस्लिम समाजाने बॅनर काढण्यास नकार दिला.
हे ही वाचा :
पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी सापडला राजस्थानात
अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे झाले वेगळे!
कोलकाता बलात्कार प्रकरण, अज्ञातांकडून रुग्णालयाची तोडफोड !
मुंब्रा पोलिसांनी शांतता राखत कोणताही राजकीय वादविवाद होऊ नये यासाठी पुन्हा ती रॅली सुरळीतपणे सोडली. या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई सह इतर स्वातंत्र्यसैनिकांचे देखील पोस्टर दिसत होते. दरम्यान, टिपू सुलतानच्या बॅनरवरून भाजपने टीका केली आहे.
भाजप नेते आमदार नितेश राणे म्हणाले की, काही जिहादी मुंब्रामध्ये राहिलेले आहेत. महाराष्ट्रांमधे अनेक ठिकाणी आहेत, त्यांना योग्य वेळी ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही हातात घेतला आहे. त्यांना लवकरच टिपू सुलतानकडे पाठवण्यात येईल, असं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केलं आहे.