प्रजासत्ताक संचलनात आदिवासी चित्रकलेचे दर्शन

प्रजासत्ताक संचलनात आदिवासी चित्रकलेचे दर्शन

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात आदिवासी संस्कृतीचे दर्शन होणार आहे. आदिवासींचा इतिहास चित्राच्या माध्यमातून समोर येणार असून देशभरातील आदिवासींनी हे चित्र साकारले आहे. अमृत मोहोत्सवाच्या या कार्यक्रमातून जगाच्या कानाकोपऱ्यात आदिवासी संस्कृती पोहोचणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवानिमित्त भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनी संचलनात आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या चित्राचा समावेश करण्यात आला आहे. ६ बाय ४५ फुटांच्या चित्रातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. देशभरातील २५० आदिवासी चित्रकारांनी हे चित्र साकारले असून पालघर जिल्ह्यातील २० वारली चित्रकारांचा सहभाग आहे.

चित्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंतच्या आदिवासी संस्कृतीतील घटना आहेत. पाच चित्रांची ही मालिका असून त्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी देशभरात आदिवासींवर होणारा छळ, अन्याय आणि त्याविरुद्ध अदिवासींनी दिलेला लढा, स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासाठी संघटना तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समुहाने एकत्र राहून शेती व शेतीपूरक व्यवसाय करत असल्याचे चित्रात साकारले आहे.

हे ही वाचा:

संगीत रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या कीर्ती शिलेदार यांचे निधन

मुंबईतील भाटिया रूग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग; १५ जखमी

एन्काउंटर स्पेशालिस्ट ए ए खान यांचे निधन

मोदी का ठरले बेस्ट पीएम?

नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडन आर्टने पंजाब येथील चितकारा विद्यापीठात २४ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत कार्यशाळा घेण्यात आली होती. यात देशभरातील २५० चित्रकारांचा सहभाग होता. यामध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील २० कलाकार होते. डहाणूच्या गंजाड गावचे जगप्रसिद्ध वारली चित्रकार पद्मश्री कै. जिव्या सोमा म्हसे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या शिष्यांसह इतर १७ जण या चित्रशैलीत सहभागी आहेत. तर विक्रमगड तालुक्यातील तीन जणांचा सहभाग आहे.

Exit mobile version