पंतप्रधान निवासस्थानी ‘दीपज्योती’चे आगमन!

नरेंद मोदींनी शेअर केले खास फोटो

पंतप्रधान निवासस्थानी ‘दीपज्योती’चे आगमन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबद्दल माहिती दिली आहे. शिवाय सोबतच या नव्या पहुण्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करण्यात आले आहेत.

पंतप्रधान निवासात असलेल्या गाईने एका वासराला जन्म दिला आहे. या गायीच्या वासरासोबतचे काही गोड फोटो तसचे एक व्हिडीओ पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. पंतप्रधान मोदींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते गायीच्या वासराला जवळ घेऊन कुरवाळताना दिसत आहेत. तसेच ते त्याला टिळा लावून फुलाचा हार देखील घालताना दिसत आहेत. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी हे लहानशा वासराला उचलून घेऊन बागेत फिरताना देखील दिसत आहेत.

त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे की, गावः सर्वसुख प्रदाः लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी एका नव्या सदस्याचे शुभ आगमन झाले आहे. पंतप्रधान निवासस्थानी एका गायीने नुकतेच एका वासराला जन्म दिला आहे, ज्याच्या मस्तकावर ज्योतीचे चिन्ह आहे, म्हणून त्याचे नाव दीपज्योती ठेवण्यात आले आहे,” अशी माहिती देण्यात आली आहे. या वासराच्या कपाळावर एक ‘ज्योती’चे निशाण आहे. यावरूनच या वासराचे नाव पंतप्रधान मोदींनी ‘दीपज्योती’ असे ठेवले आहे.

हे ही वाचा:

वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या पाच जणांच्या आवळल्या मुसक्या

कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले; निर्यात शुल्कातही २० टक्के कपात

सुरक्षा दलाकडून जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्राण्यांविषयी विशेष प्रेम असल्यचे वारंवार दिसून आले आहे. त्यांना वेळ मिळताच ते अधूनमधून पंतप्रधान निवासातील प्राण्यांसोबत वेळ घालवत असतात. पंतप्रधान निवासमधील गार्डनमध्ये मोर असून त्यांच्या सोबतचे फोटोही पंतप्रधानांनी शेअर केले आहेत. त्याचबरोबर पंगनूर गायींसोबतही वेळ घालवताना नरेंद्र मोदी दिसले होते.

Exit mobile version