कोरोना महामारीनंतर यावर्षी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज, २७ ऑगस्ट रोजी चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा सुरु आहे. या आगमनाला भाविकांनी तुफान गर्दी केली आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा १०३ वे वर्ष साजरा करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे आगमन सोहळा साजरा झाला नव्हता. दोन वर्षांनंतर आगमन सोहळा साजरा होत असल्याने भाविकांनी आगमन सोहळ्याला मर्यादेच्या बाहेर गर्दी केली आहे. ढोल ताश्यांच्या गजरात चिंतामणीचा आगमन सोहळा सुरु आहे. दोन वर्षांनंतर चिंतामणीची भव्य मूर्ती आज मंडपात विराजमान होणार आहे. या सोहळयात होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई ट्राफिक विभागाने या भागात दहा तासांसाठी काही रस्ते बंद केले आहेत.
यंदा चिंतामणीच्या गणेशाची मूर्ती हटके असणार आहेच आणि मंडप देखील भव्यदिव्य असा सजवण्यात आला आहे. चिंतामणीसाठी यक्षिणी देवीचं मंदीर उभारलं जाणार आहे. गणेश मूर्ती १२ फुटाची असून चिंतामणीचं प्रभावळ हे संपूर्ण २२ फुटाचं असणार आहे. रंगबिरंगी डेकोरेशन आणि कमळात विराजमान बाप्पा सर्वांचं लक्ष वेधणार यात शंका नाही. तसेच, यावर्षी विविध स्पर्धा देखील आयोजीत करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकलंत तर मिळतील अर्धा कोटी
‘दिल्लीची शिक्षण व्यवस्था पोकळ आणि नौटंकी’
न्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ
‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट
कोरोनाच्या संकटामुळे मंडळाकडून भव्य मूर्ती ऐवजी चांदीची मूर्ती पुजून गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. पण यावर्षी चिंतामणी पूर्वीप्रमाणे मंडपामध्ये दहा दिवस विराजमान होऊन भाविकांना दर्शन देणार आहे. ३१ ऑगस्ट दिवशी रितसर प्राणप्रतिष्ठा करून भाविक बाप्पाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.