भारताविरुद्ध १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी- २०, कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. सोमवार, ४ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेने तिन्ही फॉरमॅटसाठी संघ जाहीर केले.
दरम्यान, कर्णधार टेंबा बावुमाला मर्यादित षटकांच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे. मात्र, तो कसोटी मालिकेत पुनरागमन करणार असून कर्णधार पद त्याच्याकडेच आहे. टेंबा बावुमा टी- २० आणि एकदिवसीय मालिका खेळत नसल्यामुळे एडन मार्करामला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर बावुमा कसोटी मालिकेत संघाचे नेतृत्व करणार आहे.
भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आधीच तीन संघ जाहीर केले आहेत. या दौऱ्यात भारतीय संघाने तीन वेगवेगळ्या खेळाडूंकडे कर्णधार पद सोपवले आहे. सूर्यकुमार यादव टी- २० मालिकेत तर के एल राहुल वनडेमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. शिवाय रोहित शर्मा कसोटी मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. दोन्ही फलंदाज केवळ कसोटी मालिकेत खेळणार आहेत.
हे ही वाचा:
२०२४ ला देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील
तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू!
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!
अधिवेशनात पराभवाचा राग काढू नका
दक्षिण आफ्रिकेचा टी- २० संघ–
एडन मार्कराम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रेटकजे, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरिया, रीझा हेंड्रिक्स, मार्को जेन्सन, हेन्रिक. क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझार्ड विल्यम्स
दक्षिण आफ्रिकेचा एक दिवसीय संघ–
एडन मार्कराम (कर्णधार), बार्टमॅन, नांद्रे बर्जर, टोनी डी जोर्गी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहाली पोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, रस्सी, रस्सी वेरेयन, लिझाद विल्यम्स
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ–
टेंबा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डीजॉर्गी, डीन एल्गर, मार्को जेन्सन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो स्टेब्स, ट्रायब्स, ट्रायब्स काइल व्हेरीन