मध्यप्रदेशात एक विक्रमोत्सव पार पडला. या महोत्सवात गीतकार मनोज मुंतशीर यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी या भाषणात मुघलांना लुटारू म्हणत कठोर टीका केली आहे. कदाचित तुम्हाला हे माहित नसेल, जेव्हा आपल्या देशात उपासमारीने ३५ लाख लोकांचा जीव गेला होता. त्या वेळी एक राजा, शाहजहान नऊ कोटी रुपये खर्च करून ताजमहाल बांधत होता, असे ते म्हणाले आहेत.
गीतकार मनोज मुंतशीर यांनी मुघल शासकांचे वर्णन लुटारू असे केले आहे. शाहजहानने ताजमहाल बांधण्यासाठी जेवढे पैसे खर्च केले त्या पैशात संपूर्ण देशातील गरिबी हटवता आली असती, असे मुंतशीर म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले, ” एकीकडे आपण महाराजा विक्रमादित्य पाहिले आहेत आणि एकीकडे हे मोठे दरोडेखोरही पाहिले आहेत. मुघलांनी ताजमहाल बांधला आणि डाव्या हाताचे इतिहासकार ही प्रेमाची खूण आहे, असे जबरदस्तीने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या सम्राटांनी गरिबांच्या प्रेमाची खिल्ली उडवली असून ताजमहालला ते प्रेमाचे लक्षण म्हणत आहेत.”
प्रेमाची खूण काय असते हे सांगताना मुंतशीर यांनी चित्तोड किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यास लोकांना सांगितले. ते म्हणाले, प्रेमाची खूण जाणून घ्यायची असेल तर, मग चित्तोड किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या, जिथे माता पद्मिनीने राजा रतन सिंहच्या वियोगात स्वतःला ज्वाळांमध्ये झोकून दिले. प्रेमाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल, तर राजा रामाने माता सीतेसाठी समुद्रात पूल बांधला होता, त्याचा अभिमान बाळगा, हे प्रेमाचे लक्षण आहे.
हे ही वाचा:
…म्हणून वृद्ध महिलेने आयुष्यभराची जमापुंजी केली राहुल गांधींच्या नावावर
संजय राऊतांची मालमत्ता ईडीकडून जप्त
मुख्यमंत्री भेटत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची तक्रार
‘संजय राऊत, उद्धव ठाकरेंना वाटतं केंद्रीय तपास यंत्रणांची तोंडे बंद करु शकतो’
यासोबतच मनोज मुंतशीर म्हणाले की, आम्हाला सलीम अनारकली आणि जोधा अकबर यांच्या प्रेमाच्या खोट्या कथा दाखवल्या. आता हे सर्व भ्रम तोडण्याची वेळ आली आहे. ताजमहालाच्या आधीही आपण येथे महाकालाचे भव्य मंदिर बांधले होते.आपल्याकडे पूर्वीपासूनच चंदेला राजांनी बांधलेली भव्य मंदिरे आहेत. आमच्या इथे अजिंठा आणि एलोरा आहे. या सर्व भव्य गोष्टी भारतात ताजमहालच्या आधीच तयार केल्या आहेत.