विशाळ गडावरील अतिक्रमण काढण्यास प्रशासनाकडून सुरुवात !

गडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

विशाळ गडावरील अतिक्रमण काढण्यास प्रशासनाकडून सुरुवात !

हिंदू संघटनांनी आणि शिवभक्तांनी सुरु केलेल्या ‘विशाळ मुक्ती संग्राम मोहिमे’ला आता यश मिळत आहे. गडावरील अतिक्रमण काढण्यास प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. विशाळ गड परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संचार बंदी लागू करण्यात आली आहे.

पांढरे पाणी याठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे. पावनखिंड, विशाळ गड, आणि गजापूर मार्गावर देखील मोठा पोलीस फौजफाटा उभा आहे. स्थानिकांशिवाय अन्य लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी विशाळ गडावर दाखल झाले आहेत. गडावरील अतिक्रमण केलेली दोन आस्थापने प्रशासनाने काढून टाकल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

‘म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात’… !

‘कॅम्लिन’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन

इम्रान खान यांच्या पक्षावर पाक सरकार घालणार बंदी!

चीन समर्थक केपी ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी !

छत्रपती संभाजी राजे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी संभाजी राजे शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाले होते. मात्र, याबाबत पोलिसांनी काहीच बोलले नसल्याची माहिती दिली. प्रशासनाने गडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही जातील उद्देशून ही कारवाई होत नसून अतिक्रमण केल्यांविरोधात ही कारवाई सुरु असल्याचे ते म्हणाले. प्रशासनाने कारवाई करत दोन अतिक्रमण काढले असून हे हिंदू समाजाचे लोक आहेत. प्रकाश पाटील आणि वेल्लाळ अशी यांची नावे आहेत. त्यामुळे कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करू नये, असे छत्रपती संभाजी राजेंनी सांगितले.

Exit mobile version