24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषराज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

मुंबई, पुणे, रायगड जिल्ह्यातील प्रशासनाला सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Google News Follow

Related

मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट असल्यामुळे पुढचे तीन -चार तास अधिक महत्वाचे आहेत. महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. तशा त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. एकूण २२२ पंप मुंबईभर सुरु आहेत. घाटकोपर आणि कुर्ला येथे पाणी साचले होते, ते काढण्याचे काम सुरु आहे. लोकांचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे आवश्यक असेल तरच घरातून नागरिकांनी बाहेर पडावे. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलतना केले. मुंबईसह पुणे आणि रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत, असेही शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुणे जिल्ह्यात खडकवासला, मावळ, मुळशी येथे खूप पाउस झाला. धरणाच्या क्षेत्रात खूप पाउस झाल्यामुळे पुण्यात पाणी भरले. तेथील सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. आर्मीच्या अधिकाऱ्याशी बोलून त्यांच्या रेस्क्यू टीमला सज्ज राहण्यास सांगितले आहे. जिथे लोक अडकले असतील त्यांना वेळ पडली तर एअर लिफ्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे ही वाचा:

कोल्हापुरात पंचगंगेचा रेड अलर्ट !

कॅनडातील हिंदू खासदार चंद्र आर्य यांना खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून धमकी

पुण्यात पावसाचा हाहाःकार; शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती

मुसळधार पावसामुळे मुंबईतील तलावांसह धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा

रायगा जिल्ह्यात आंबा, कुंडलिका, सावित्री नदीला पूर आला आहे. रायगडच्या जिल्हाधीकाऱ्याशी बोललो आहे. दरड प्रवण क्षेत्रातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याबद्दल प्रशासन अलर्ट असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा