कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आलेला आरोपी विशाल गवळीने आत्महत्या केली आहे. आरोपीने नवी मुंबईतील तळोजा कारागृहात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. आरोपीने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिली. आरोपी विशाल गवळी मागील तीन महिन्यांपासून तळोजा कारागृहात कैद होता. दरम्यान, आरोपीच्या आत्महत्येमुळे कल्याणमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पिडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी देवाची पूजा करत मुलीला श्रद्धांजली वाहिली.
कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी विशाल गवळीने एका अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर तिची हत्या केली आणि तीचा मृतदेह बॅगमध्ये भरून बाहेर निर्जनस्थळी फेकला. विशेष म्हणजे, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या पत्नीने देखील आरोपीला मदत केली होती.
पोलिसांनी तपासणी करत आरोपी विशाल गवळीला अटक केली असता त्याच्यावर याआधीच बलात्कार, पोक्सो आणि विनयभंगासारखे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी तपासणी करत आरोपी विशाल गवळीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली होती. यानंतर त्याची नवी मुंबईतील तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
हे ही वाचा :
‘वक्फ कायद्याला विरोध करणारे मूर्ख’
झारखंड : पोलिसांनी घेराव घालत सहा नक्षलवाद्यांना केली अटक !
बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत!
चिदंबरम यांनीच नष्ट केला होता २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा
मागील तीन महिन्यांपासून तो शिक्षा भोगत होता. याच दरम्यान, आरोपीने कारागृहातील बाथरूममध्ये टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली. आज (१३ एप्रिल) पहाटे ३:३० वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिस पथकही आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र, आरोपीच्या आत्महत्येने तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.