रविवारी रात्री नवले पुलाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल ४७ वाहनांचा चुराडा झाला असून, या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. ट्र्कचा ब्रेक निकामी झाला त्यामुळे अपघात झाला असं सांगितलं जातं होते. मात्र या अपघाताचं खरं कारण समोर आले आहे.
अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक मनीलाल यादव फरार झाला होता. मनीलाल यादव हा मुळचा मध्य प्रदेशचा आहे. मनीलाल यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या भरधाव ट्र्कचा अपघात झाला. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल ४७ वाहनांना ट्र्कने चिरडले. या अपघातात १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात ट्र्कचे ब्रेक निकमी झाल्याने घडल्याचं सांगण्यात येतं होता. मात्र ट्र्क चालकाने उतारावर गाडी न्यूट्रल करुन चालवल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. उतारावर इंजिन बंद करुन चालकाने गाडी चालवली होती. त्यामुळे ती कंट्रोल होऊ शकली नाही आणि अपघात झाला. चालकाच्या या मस्तीमुळे १२ जण जखमी झालेत तर ४७ वाहनांचे नुकसान झालं आहे.
हे ही वाचा :
श्रद्धाच शीर मैदान गढीतील तलावात, आरोपीची कबुली
भारतीयांचा फोटो काढण्यास ‘ऑस्ट्रेलिया पोस्ट’चा नकार
पियुष गोयल म्हणतात, ट्विटरची जागा ‘या’ भारतीय अॅपने घ्यावी
नवले पुलावर भीषण अपघात, ट्र्कने ४७ वाहनांना उडवले
या अपघाताची माहिती मिळताच रस्त्याने जाणारे वाटसरू, स्थानिक नागरिक, प्रवासी, अग्निशामक दल, वाहतूक शाखा, सिंहगड रोड व दत्तवाडी पोलिस घटनास्थळी मदतीला धावून आले.