पत्राचाळीच्या पुनर्वसित इमारतीतील मूळ ६७२ रहिवाशांना मिळणार हक्काचे घर!

पत्राचाळ पुनर्विकासाचे वचन पूर्ण करणाऱ्या महायुती सरकारचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले अभिनंदन

पत्राचाळीच्या पुनर्वसित इमारतीतील मूळ ६७२ रहिवाशांना मिळणार हक्काचे घर!

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसित इमारतीतील मूळ ६७२ रहिवाशांना आता त्यांचे हक्काचे घर लवकरच मिळणार आहे. मूळ रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. यासाठी ४ एप्रिल रोजी सोडत काढण्यात येणार आहे.

गोरेगाव, सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या पुनर्वसित इमारतीतील घरांचा ताबा देण्यासाठी मंडळाकडून काढण्यात येणारी सोडत यापूर्वी रहिवाशांच्या विरोधामुळे रखडली होती. अनेक वेळा सोडत रद्दही करण्यात आली होती. मात्र, अखेर आता हा मार्ग मोकळा झाला असून ४ एप्रिल रोजी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोरेगाव येथे ६२९ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान, ६२९ घरांसाठी रहिवासी पात्र ठरल्याने यावेळी ६२९ घरांसाठीच सोडत काढली जाणार आहे. उर्वरित घरे मुंबई मंडळाच्या ताब्यात राहणार आहेत. जसे रहिवाशी कागदपत्रे सादर करून पात्र ठरतील तसा त्या घरांचा ताबा दिला जाणार आहे. दरम्यान, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राचाळ पुनर्विकासाचे वचन पूर्ण करणाऱ्या महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे.

पत्राचाळ घोटाळा या १,०३४ कोटींच्या घोटाळ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. गोरेगाव येथील पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. ‘ईडी’च्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळच्या तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूंना, तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ तसेच २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळीचा पुनर्विकास केला नाही. बँकेतूनही ९५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले. हा सर्व पैसा प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले.

हे ही वाचा : 

मातोश्रीवर वक्फ बोर्डाची करडी नजर पडेल तेव्हा बोला!

‘आतापर्यंत वक्फ विधेयकात जे बदल झाले, ते मौलवींच्या दबावामुळे!’

काँग्रेस काळात समिती फक्त शिक्का मारायची

शुक्रिया मोदी जी ! भोपाळमध्ये मुस्लिम महिला मोदींच्या पाठीशी!

प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातही पैसे जमा केले. त्याच रकमेतून वर्षा संजय राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला. प्रविण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्ती आहेत. त्यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये गेले होते. पण, हे पैसे १० वर्षानंतर परत करण्यात आले. हे पैसे कर्जाच्या स्वरुपात घेतले होते, असा दावा संजय राऊतांच्या पत्नीने केला होता. पण, संजय राऊतांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे ईडीने संजय राऊतांच्या कुटुंबीयांवर छापेमारी केली आणि अटकही केली होती. सध्या संजय राऊत जामीनावर बाहेर आहेत.

मारून मुटकून मराठी ? | Mahesh Vichare | Raj Thackeray | Balasaheb Thackeray | Shivsena | MNS |

Exit mobile version