युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने पहिल्याच वर्ल्डकपमध्ये केला विश्वविक्रम

युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने पहिल्याच वर्ल्डकपमध्ये केला विश्वविक्रम

टी-२० विश्वचषक २०२४चा नववा सामना पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांच्यात खेळला गेला. युगांडा खेळत असलेला हा पहिलाच टी-२० विश्वचषक. युगांडाने पापुआ न्यू गिनीचा पराभव करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात युगांडाच्या ४३ वर्षीय फ्रँक सुबुगाने विश्वविक्रम करत इतिहास रचला आहे. न्सुबुगाने टी-२० गोलंदाजी करताना विश्वचषकात सर्वात कमी धावा देण्याचा विक्रम केला आहे.

दोन विकेट्स घेत नसुबुगाचा विश्वविक्रम
वयाच्या ४३व्या वर्षी, फ्रँक न्सुबुगाने त्याच्या पहिल्या टी-२० विश्वचषक सामन्यात शानदार गोलंदाजी केली. केवळ ४ धावा दिल्या आणि १.००च्या इकॉनॉमीसह २ विकेट्स घेतल्या. नसुबुगा हा ऑफ स्पिनर गोलंदाज आहे. त्याने पापुआ न्यू गिनीचे दोन महत्त्वाचे फलंदाज हिरी हिरी आणि चार्ल्स अमिनी यांना आपले बळी बनवले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे युगांडाने पापुआ न्यू गिनीचा अवघ्या ७७ धावांत पराभव केला.

टी-२० विश्वचषकात सर्वाधिक किफायतशीर गोलंदाज
फ्रँक सुबुगा व्यतिरिक्त, टी-२० विश्वचषक २०२४च्या नवव्या सामन्यात, युगांडाच्या आणखी एका खेळाडूने आपल्या किफायतशीर गोलंदाजीने या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा ओटनील बार्टमन हा टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम कमी धावा देणारा गोलंदाज होता. पण आता युगांडाच्या फ्रँक न्सुबुगाने या स्थानावर झेप घेतली आहे.

गोलंदाज देश विकेट धावा इकॉनॉमी रेट
फ्रैंक नसुबुगा युगांडा १.००
ओटनील बार्टमैन दक्षिण आफ्रिका २.२५
जुमा मियाजी युगांडा १० २.५०
दीपेंद्र ऐरी नेपाळ ३.००
फाफ डू प्लेसिस दक्षिण आफ्रिका ३.००

 

युगांडाचा पहिलाच टी-२० विश्वचषक
पहिला टी-२० विश्वचषक २००७ मध्ये खेळला गेला. टी-२० विश्वचषक २०२४ सह या स्पर्धेची ही नववी स्पर्धा आहे. याआधी युगांडा कधीही टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरला नव्हता. पण युगांडाने टी-२० विश्वचषकाच्या नवव्या मोसमात पात्रता मिळवली आणि युगांडाच्या संघासाठी ही पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा आहे.

हेही वाचा :

रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार!

स्वप्नील सावरकर यांना ‘व्रतस्थ पत्रकारिता’ पुरस्कार

उत्तराखंडमध्ये बेपत्ता ट्रेकर्सच्या मृत्यूच्या संख्येत वाढ, आणखी ५ दगावले!

‘भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सची तिसऱ्यांदा अवकाशात झेप’

युगांडाचा पहिल्या टी-२० विश्वचषकात पहिला विजय
टी-२० विश्वचषक २०२४च्या नवव्या सामन्यापर्यंत युगांडाने दोन सामने खेळले आहेत. युगांडाचा पहिला सामना टी-२० विश्वचषक २०२४ मधील पाचवा सामना होता. युगांडाचा हा सामना अफगाणिस्तान विरुद्ध होता. जो अफगाणिस्तानने १२५ धावांनी जिंकला. युगांडाचा दुसरा सामना टी-२० विश्वचषक २०२४चा नववा सामना होता. जो पापुआ न्यू गिनी विरुद्ध खेळला गेला. या सामन्यात युगांडाने पापुआ न्यू गिनीचा ३ गडी राखून पराभव केला. युगांडाचा टी-२० विश्वचषकातील हा पहिला विजय आहे.

Exit mobile version