गुजरातच्या अदानी बंदरावर ट्रकमध्ये हजारो गायी दाखवणारा एक व्हिडीओ प्रचंड प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ गुजरातच्या बंदरावरील नसून तो इजिप्तमधील असल्याचे व्हिडीओच्या तथ्य तपासणीत समोर आले आहे. हा व्हीडीओ दिशाभूल करणारा आणि चुकीचे वर्णन करणारा असल्यचेही स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओमध्ये गुजरातमधील अदानी बंदरातून हजारो गायी कत्तलीसाठी अरब देशांमध्ये नेल्या जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सुरुवातीला संदीप वर्मा नावाच्या एकाने खोट्या दाव्यासह शेअर केला होता. नंतर तो सूर्य राजसह अनेकांनी व्हायरल केला. हा व्हिडीओ १ दशलक्ष पेक्षा अधिक लोकांनी पाहिला गेला आहे.
या व्हिडीओचे तथ्य तपासले असता हे समोर आले की हे फुटेज इजिप्तमधील असून सुमारे पाच दिवसांपूर्वी पोस्ट केले गेले होते. तेथील मीट मार्केटमधील हा व्हिडीओ आहे. हे फुटेज ईद अल-अधाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाशी संबंधित आहे. या उत्सवाला बलिदानाचा उत्सव म्हणून ओळखले जाते.
हे ही वाचा:
‘तो’ व्हिडीओ गुजरातमधील नसून इजिप्तचा !
महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान छत्तीसगडमधून अटक!
‘राजपुत्रामध्ये नवाब, निजाम, सुलतान आणि बादशाह विरोधात बोलण्याची ताकद नाही’
हा व्हीडिओ घेऊन अदानी यांच्या बंदरात अशा गाई आणल्या गेल्या आहेत असे म्हणत भाजपाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता तो गुजरातच्या मुंद्रा बंदराचा नाही तर इजिप्तमधला आहे आणि मुस्लिम सणानिमित्त इजिप्तमध्ये या गाई आणल्याचे सोशल मीडियात चर्चेत होते.