26 C
Mumbai
Sunday, February 23, 2025
घरविशेष'छावा' चित्रपटातील 'ते' दृश्य हटणार, पण भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची आणखी एक मागणी!

‘छावा’ चित्रपटातील ‘ते’ दृश्य हटणार, पण भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची आणखी एक मागणी!

चित्रपटाच्या दिग्दर्शकांना पत्र लिहून केली विनंती

Google News Follow

Related

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रपटातील महाराजांच्या लेझीम नृत्यामुळे आक्षेप नोंदवण्यात आला होता. मात्र, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटातील ते दृश्य काढून टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण-जिल्हा) राजेश शिरवडकर यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना पत्र लिहून चित्रपटातील एक संवाद बदलण्याची विनंती केली आहे.

खरे तरं, चित्रपटामध्ये “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा” असा संवाद रेकॉर्ड केला गेला आहे. मात्र, “हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा”, असा संवाद असल्याचे राजेश शिरवडकर यांनी पत्रात म्हटले आहे. हा बदल संभाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे लेझीम नृत्यासंदर्भात जो निर्णय घेतला तसाच निर्णय “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा” या वाक्याबाबत घेवून ते “हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा” असे पूर्ण करावे अशी विनंती त्यांनी दिग्दर्शकांना केली.

राजेश शिरवडकर यांनी पत्रात म्हटले, “छावा चित्रपटावरील चुकीचा वाद आपण खरा विरोध कशाला करीत आहोत?” खाली दिलेली संवादाची चूक सुधारावी. “छावा” चित्रपटावरील सध्या सुरु असलेल्या वादात राजकीय आणि सोशल मीडियातील चर्चेचे स्वरूप खूपच आश्चर्यकारक आहे. या वादाचा केंद्रबिंदू लेझीम नृत्य बनला आहे. लेझीम नृत्याबद्दल चर्चा करून विरोध करण्याऐवजी, आपल्याला अधिक समंजस आणि परंपरेचा आदर करणारे विचार अपेक्षित होते. गाण्याच्या शब्दांना विरोध होता, तर गाणे बदलता आले असते, परंतु लेझीम नृत्य कायम ठेवता आले असते. परंपरेचा सन्मान राखत चित्रपट अधिक सुसंगत आणि योग्य रीतीने सादर करता आला असता.

मात्र, खरा आणि गंभीर मुद्दा कुठेतरी दुर्लक्षित राहिला आहे, आणि तो म्हणजे चित्रपटात बदललेले एक अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक वाक्य. “हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा” हे ऐतिहासिक वाक्य बदलून “हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा” असे दाखवले गेले आहे. हा बदल संभाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा अपमान आहे. “हिंदवी स्वराज्य” ही केवळ सत्ता मिळवण्याची कल्पना नव्हती, तर ती सांस्कृतिक आणि धार्मिक उ‌द्दिष्टांची पूर्तता करणारी एक ध्येयवादी योजना होती, जी आपल्या समाजाला एकत्र आणणारी होती.

हे ही वाचा : 

विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या करण्यासाठी विद्यार्थ्याला १०० रुपयांची सुपारी!

एनआयएने तामिळनाडूमध्ये १६ ठिकाणी छापे

राणा अय्युब विरुद्ध एफआयआर दाखल

सॅम पित्रोदा म्हणतात, बिच्चारे बांगलादेशी पैसे कमवायला येतात, त्यांना त्रास का देता?

खरा प्रश्न असा आहे की आपण फक्त वरवरच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत, आणि जे खरे गंभीर आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे आहे, ते दुर्लक्षित केले जात आहे पण जे खरे चिंताजनक आहे, ते म्हणजे इतिहासातील वाक्यांमध्ये बदल करून हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेशी छेडछाड करणे. “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा” हे वाक्य चुकीचे असून “हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा” असे वाक्य आहे. हा संवाद आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत, आणि त्यामध्ये कोणताही बदल होऊ नये, संभाजी महाराजांच्या जीवनातील आणि हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाची खरी भावना प्रामाणिकपणे चित्रपटात सादर केली पाहिजे.

आपण फक्त वाद निर्माण करण्यासाठी वाद करत आहोत, पण जे खरे गंभीर आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, त्यावर योग्य विचार झाला पाहिजे. फक्त लेझीम नृत्यावर चर्चा करून महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे इतिहासाच्या सन्मानाला धक्का लावण्यासारखे आहे. शेवटी, “हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा” या वाक्याचा अर्धवट बदल दाखवणे इतिहासाशी छेडछाड करण्यासारखे आहे.

हा संवाद योग्य प्रकारे चित्रपटात सादर होणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आणि त्यांचे ध्येय भविष्याच्या पिढ्यांपर्यंत पोहोचू शकेल. आम्हाला खात्री आहे आपण जसे लेझीम नृत्य यासंदर्भात जो निर्णय घेतला आहे तसाच “हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा” हे वाक्य पूर्ण करावे ही विनंती, असे राजेश शिरवडकर यांनी पत्रात म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
231,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा