आज ८९ वा भारतीय वायुसेना दिवस साजरा केला जात आहे. या विशेष दिवसाच्या निमित्ताने भारतीय वायु सेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील हिंडन एअर फोर्स स्टेशन येथे वायु सेनेतर्फे कार्यक्रम पार पडताना दिसत आहेत. दार वर्षी ८ ऑक्टोबरला भारतीय वायु सेना दिवस साजरा केला जातो. या मागे एक विशेष कारण आहे.
आज भारतीय वायुसेना ही जगातल्या अद्ययावत आणि बलशाली वायु सेनांपैकी एक समजली जाते. भारतीय वायुसेना ही जगातली चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी वायुसेना आहे. तर उत्तर प्रदेशातील भारतीय वायुसेनेचे हिंडन एअर फोर्स स्टेशन हे आशिया खंडातील सर्वात मोठे एअर फोर्स स्टेशन आहे. अशा या गौरवशाली वायुसेनेची स्थापना आजपासून ८९ वर्षांपूर्वी म्हणजेच १९३२ साली झाली. भारत देश तेव्हा पारतंत्र्यात होता. ८ ऑक्टोबरच्या दिवशी भारतीय वायू सेनेची अधिकृत स्थापना करण्यात आली. तेव्हा युनायटेड किंग्डमच्या रॉयल एअर फोर्सला सहाय्यक म्हणून स्थापन करण्यात आली होती. पण भारत स्वतंत्र झाल्यावर ही वायुसेना भारतीय सैन्याचे एक प्रमुख अंग बनले. त्यामुळेच ८ ऑक्टोबर रोजी भारतीय वायुसेना दिवस साजरा केला जातो.
हे ही वाचा:
पवई तलावाच्या रक्षणासाठी सरसावले मनोज कोटक
छत्तीसगडमध्ये का सुरु झाला हिंदू-मुसलमान संघर्ष?
NCB वर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिकना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून भारतीय वायुसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या हवाई योद्ध्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा भारतीय वायुसेना म्हणजे शौर्य, परिश्रम आणि व्यावसायिकता यांना समानार्थी शब्द आहे. त्यांनी गरजेला देशाचे संरक्षण करून आणि आव्हानांच्या प्रसंगी मानवता दाखवत स्वतःला इतरांपासून वेगळे सिद्ध केले आहे.