“सुरक्षा दलाच्या शौर्यामुळे मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करणार!”

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साओ यांच्याकडून केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार

“सुरक्षा दलाच्या शौर्यामुळे मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करणार!”

छत्तीसगडमधील सुरक्षा दलांनी शनिवार, २९ मार्च रोजी सुकमा जिल्ह्यातील केरलापाल भागात झालेल्या चकमकीत तब्बल १६ नक्षलवाद्यांना ठार केले. शिवाय या परिसरातून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला. केंद्र सरकारने ‘नक्षल मुक्त भारत अभियान’ सुरू केले असून याअंतर्गत सुरक्षा दलांकडून नक्षलग्रस्त भागांमध्ये कारवाई सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाविरोधात केंद्र सरकारच्या झीरो टॉलरन्स भूमिकेचा पुनरुच्चार वारंवार केला आहे. शिवाय ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. या चकमकीनंतर, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साओ यांनीही सशस्त्र नक्षलवादाचे उच्चाटन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

अरुण साओ म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मार्च २०२६ पर्यंत देशातून सशस्त्र नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचा संकल्प आहे आणि आमचे सुरक्षा दल त्याच दिशेने काम करत आहेत. आमचे सुरक्षा दल ज्या शौर्य आणि धाडसाने काम करत आहेत, त्या शौर्यामुळे आम्ही दिलेल्या वेळेत नक्षलवादाचे उच्चाटन करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी, सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी घटनास्थळावरून १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडल्याची पुष्टी केली आणि सांगितले की, “आमच्या दोन जवानांना ऑपरेशन दरम्यान दुखापत झाली आहे आणि त्यांना वैद्यकीय मदतीसाठी बाहेर आणण्यात आले आहे.” त्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी परिसरातून AK-47 रायफल्स, सेल्फ-लोडिंग रायफल्स (SLR) आणि INSAS रायफल्ससह अत्याधुनिक शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. सुकमा येथे आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या चकमकींपैकी ही एक चकमक म्हणता येईल,” असे किरण चव्हाण म्हणाले.

हे ही वाचा..

“कठीण काळात म्यानमारच्या लोकांसोबत भारत एकजुटीने उभा”

संभलमध्ये खुलेआम मटण विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार

हिंदू नववर्षाच्या भव्य स्वागतासाठी हिंदवी एकता मंचच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन

चीनची आव्हान : फिलिपिन्स, जपान आणि अमेरिका यांचा संयुक्त सैन्य सराव

अद्याप मृत नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही. शुक्रवारी जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांनी सुरू केलेल्या संयुक्त नक्षलविरोधी मोहिमेनंतर गोळीबार सुरू झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुकमा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केरलापाल परिसरात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबाबत विशिष्ट गप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली होती. संयुक्त पथक २८ मार्च रोजी शोध मोहिमेसाठी निघाले होते आणि शनिवारी (२९ मार्च) पहाटेपासून अधूनमधून गोळीबार सुरू होता. सुरक्षा दलाकडून चकमकीच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या जंगल परिसरात सखोल शोध घेत आहेत. सुकमा हा छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील सर्वात जास्त प्रभावित जिल्ह्यांपैकी एक आहे, जिथे यापूर्वी अनेक नक्षलवादी हल्ले झाले आहेत.

व्वा रे व्वा! पानिपत पराभवाचे प्रतीक औरंग्याची कबर शौर्याचे स्मारक! | Mahesh Vichare | Devendra F |

Exit mobile version