हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका २०२४ च्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल मी हरियाणाच्या जनतेला सलाम करतो, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, विकास आणि सुशासनाच्या राजकारणाचा हा विजय आहे. मी येथील जनतेला खात्री देतो की, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.
पंतप्रधान मोदींनी ट्वीटकरत म्हणाले, या महान विजयासाठी अथक परिश्रम आणि पूर्ण समर्पण भावाने काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. तुम्ही राज्यातील जनतेची केवळ सेवाच केली नाही, तर आमचा विकासाचा अजेंडा त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे हरियाणात भाजपने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
‘राहुल गांधीच्या जिंकण्यासाठी प्रचंड थापा, पण हाती माती अन तोंडही झाले काळे’
जीएसटी फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार महेश लांगा यांना अटक
‘बटेंगे तो कटेंगे’ याचं गांभीर्य समजलं, सनातनींनी योग्य निर्णय घेतला!
पुन्हा शिक्कामोर्तब झाले, मुस्लीम मतं हिच काँग्रेसच्या विजयाची हमी…
जम्मू-काश्मीरच्या निकालावर पंतप्रधान मोदी ट्वीटकरत म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या कामगिरीचा मला अभिमान आहे. ज्यांनी आमच्या पक्षाला मतदान केले आणि आमच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी जनतेला आश्वासन देतो की आम्ही जम्मू-काश्मीरच्या कल्याणासाठी काम करत राहू. मी आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचेही कौतुक करतो.
जम्मू-काश्मीरमधील या निवडणुका अतिशय खास होत्या. कलम ३७० आणि ३५(A) काढून टाकल्यानंतर ते प्रथमच आयोजित करण्यात आले होते आणि मोठ्या प्रमाणात मतदान झाले, त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दिसून आला. यासाठी मी जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरम्यान, हरियाणामध्ये भाजप आता सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहेत. हरियाणाच्या इतिहासात एका पक्षाचे सलग तीनवेळा सत्तेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ४८, काँग्रेसला ३७, आयएनएलडीला २ आणि इतरांनी ३ जागेवर विजय मिळविला आहे.
These elections in Jammu and Kashmir have been very special. They were held for the first time after the removal of Articles 370 and 35(A) and witnessed a high turnout, thus showing the people’s belief in democracy. I compliment each and every person of Jammu and Kashmir for…
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2024
हरियाणा का हृदय से आभार!
भारतीय जनता पार्टी को एक बार फिर स्पष्ट बहुमत देने के लिए मैं हरियाणा की जनशक्ति को नमन करता हूं। यह विकास और सुशासन की राजनीति की जीत है। मैं यहां के लोगों को विश्वास दिलाता हूं कि उनकी आकांक्षाओं को पूरा करने के लिए हम कोई कोर-कसर नहीं छोड़ेंगे।
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2024