‘ठाण्याच्या हवालदाराला’ दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉनमध्ये ”ब्राँझ” !

अतिशय खडतर अशा ''कॉर्मेड मॅरेथॉन स्पर्धेत कांस्य पदक'' पटकावले

‘ठाण्याच्या हवालदाराला’ दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉनमध्ये ”ब्राँझ” !

ठाण्याच्या एका हवालदाराने ‘दक्षिण आफ्रिकेत’ नुकत्याच झालेल्या ‘कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये ब्राँझपदक’ कमावण्याची कामगिरी केली आहे. ”कॉन्स्टेबल रामनाथ मेंगाळ” असे त्यांचे नाव आहे.कापूरबावडी वाहतूक पोलिस विभागात कार्यरत असणाऱ्या हवालदार मेंगाळ यांनी ११ जून रोजी १० अंश तापमानात सर्वांत कठीण अशी ८९ किमी लांबीची मॅरेथॉन १०.५ तासांत पूर्ण केली. ते यावेळी दुसऱ्यांदा या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. अशी कामगिरी करणारे ते ठाणे पोलिसातील पहिलेच हवालदार ठरले आहेत. हा पराक्रम केल्यानंतर ठाणे वाहतूक विभागाचे उपपोलिस आयुक्त डॉ. विनय राठोड यांच्या हस्ते मेंगाळ यांचा सत्कार करण्यात आला.

यंदाच्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सुमारे २० हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्र पोलिसांचे इतर दोन अधिकारी आणि ठाण्यातील अन्य काही जणांचा समावेश होता. मेंगाळ हे ठाण्याचेच रहिवासी आहेत. ठाण्यातील सर्वांत आव्हानात्मक अशा घोडबंदर रोडवरील जड वाहनांची वाहतूक सुरळीत करण्याचे काम त्यांच्यावर आहे. मात्र हे कर्तव्य बजावत असतानाच ते दररोज सरावासाठी वेळ काढत असत. त्यासाठी त्यांनी वेळेचे व्यवस्थापन केले होते. ते त्यांचे वाहतूक पोलिसाचे कर्तव्य बजावतानाच इतर मॅरेथॉन धावपटूंनाही त्यांच्या स्वत:च्या शर्यतींसाठी प्रशिक्षण देतात.

हे ही वाचा:

सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन

मर्द पुन्हा महिलेवर बाह्या सरसावू लागले…

‘विरोधी पक्षांच्या एकजुटीनेही’; ‘भाजपचे नुकसान नाही’!

‘पंतप्रधान मोदी’ आणि ‘इजिप्तचे पंतप्रधान मोस्तफा मादबौली’ यांची भेट!

‘जेव्हाही मला माझ्या कामाच्या पाळीमधून (शिफ्ट) वेळ मिळायचा, त्यात मी सराव करत होतो. दररोज व्यायाम आणि धावण्याचा सराव केल्यामुळे वाहतूक व्यवस्थापन करण्याचा दररोजचा ताण कमी झाला. गेल्या वर्षी, मी हे अंतर नऊ तास ३७ मिनिटांत पूर्ण केले होते. त्यानंतर सलग दोन वर्षे भाग घेतल्याबद्दल मला ‘बॅक टू बॅक’ पदक देण्यात आले. मात्र, अधिक चांगल्या वेळेसह पुन्हा प्रयत्न करणे हे माझे ध्येय होते. माझा विभाग आणि वरिष्ठांनी मला सरावासाठी विश्रांती देऊन खूप मदत केली,’ असे ते आवर्जून सांगतात.

Exit mobile version