ठाण्यातील इतर अनेक समस्यांसोबतच आता कचऱ्याचा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. गेल्या महिन्याभरापासून शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या सुमारे १२९ संस्थांचे काम थांबविण्यात आले आहे. पालिकेची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नसल्यामुळे या संस्थांचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे घरातील कचरा आता थेट रस्त्यांवरील कचराकुंडीमध्ये टाकला जात आहे. कचराकुंड्यांमधून या कचऱ्याने आता रस्ते व्यापण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यांवरील त्यामुळे आता ठाणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठाणे महापालिकेचे ब्रीदवाक्य ‘स्वच्छ, सुंदर ठाणे’ असे असून काही वर्षांपूर्वी स्वच्छ झोपडपट्टी या संकल्पनेला सुरुवात झाली होती. ज्या परिसरात घंटागाड्या पोहचू शकत नाहीत, अशा परिसरात घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी सुमारे १२९ बचत गटांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर एका बचत गटाला पाचशे ते हजार घरे कचरा वेचण्यासाठी देण्यात आली होती. त्यासाठी दर महिन्याला वेतन आणि इतर सुविधा देण्यासाठी सुमारे २७ लाख रुपये खर्च करत होते. त्यानंतर हे कचरावेचक कचऱ्याचे वर्गीकरण करत असत. कोरोनामुळे त्यांचे काम बंद झाले आहे.
हे ही वाचा:
गांधीनगर महापालिकेत भाजपाच सरस
तळकोकणात राणेच किंगमेकर! वेंगुर्ला नगरपालिकेत महाविकास आघाडीला धक्का
‘त्या’ १२ षटकांनी वाजवले राजस्थानचे बारा!
बसच्या लोकेशनची यंत्रणा तर बसविली, पण अॅप सुरूच नाही!
कचरावेचक संस्थांचा करार संपला असून त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महिन्याभरात पुन्हा या संस्थांना रुजू केले जाणार असल्याचे ठाणे महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापनचे उपायुक्त अशोक बुलपुल्ले यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.