ठाणे पोलीस आयुक्त त्याच बरोबर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)प्रमुख हे पद पोलीस महासंचालक दर्जाचे करण्यात आले आहे. राज्य शासनाने ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, एटीएस प्रमुख सदानंद दाते आणि जेष्ठ आयपीएस अधिकारी बिपीन कुमार सिंह यांना अप्पर पोलीस महासंचालक पदावरून बढती देऊन पोलीस महासंचालक करण्यात आले आहे. या तीन जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यासह राज्यातील २५ जेष्ठ आणि कनिष्ठ आयपीएस अधिकारी यांना बढती देऊन बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारने ठाणे पोलीस आयुक्त तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथक प्रमुखपदाचा दर्जा वाढवून पोलीस महासंचालक या दर्जाचे करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी काढण्यात आलेल्या आदेशानुसार ठाणे पोलीस आयुक्त, एटीएस प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अप्पर पोलीस महासंचालक पदावर असणारे जेष्ठ आयपीएस अधिकारी जयजीत सिंग, सदानंद दाते आणि बिपीन कुमार सिंह यांना पोलीस महासंचालक पदी पदोन्नती देण्यात आलेली . त्याच बरोबर मुंबईसह राज्यातील १२ पोलीस उपमहानिरीक्षक यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे, त्यात मुंबईतील पाच अधिकारी यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता
डेथ वॉरंट निघालेय, पण नेमके कोणाचे…?
पाकिस्तानात जन्मलेले पण ‘हिंदुस्थानचे सुपुत्र’ तारेक फतेह कालवश
पाकिस्तानात पोलिस स्टेशनवर आत्मघाती हल्ला, १२ पोलिस ठार, ४० जखमी
पोलीस अधीक्षक दर्जाचे १० अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक पदावर बढती देऊन त्यांच्या विविध ठिकाणी बदली करण्यात आली असून त्यात मुंबईतील ३ आयपीएस अधिकारी यांचा समावेश असून त्यांची मुंबईतच बदली करण्यात आली आहे.