मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त ट्वीटनंतर ठाणे पोलिसांनी मागितला नंबर

सोशल मीडिया वापरकर्त्याने आदिपुरुषमधील हनुमान यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्याचे छायाचित्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र एकत्र ट्वीट केले

मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त ट्वीटनंतर ठाणे पोलिसांनी मागितला नंबर

प्रभास अभिनित आदिपुरुष चित्रपट शुक्रवारी देशभर प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटात रावण, राम, हनुमान यांच्या व्यक्तिरेखांवरून वाद सुरू झाले आहेत. सोशल मीडियावर चित्रपटातील संवादावरून चर्चा सुरू आहे. त्यात ट्विटरवर एका यूजरने चित्रपटातील एक दृश्य ट्वीट केले. त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांच्याकडे त्यांचा फोन नंबर मागितल्याने हे ट्वीट भलतेच गाजले आहे.

अभय नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने चित्रपटातील हनुमान यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्याचे छायाचित्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र एकत्र ट्वीट केले. ‘मला माहीत नव्हते की, चित्रपटात एकनाथ शिंदेही आहेत,’ असे ट्वीट त्याने केले. अभयने आदिपुरुष चित्रपटातील सर्व हॅशटॅगना टॅग करून एकनाथ शिंदे यांच्या अकाऊंटलाही टॅग केले. त्यानंतर ठाणे पोलिसांनी लगेचच त्याचा संपर्क क्रमांक मागितला. ‘कृपया डीएम करून आपला संपर्क क्रमांक द्यावा,’ असे पोलिसांनी लिहिले. तेव्हा त्याने ‘का, सर?’ असे विचारले. तर, दुसऱ्या एका ट्वीटमध्ये पोलिसांनी अभयला आपला नंबर देऊन तिथे फोन करण्यास सांगितले. ट्विटर वापरकर्त्याचे हे दुसरे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. साडेसहा लाखांहून अधिक व्ह्यूज या ट्वीटला मिळाले आहेत. तसेच, ९२४ हून अधिक रीट्विट झाले आहेत. १५० हून अधिक वापरकर्त्यांनी ट्वीटला कोट देऊन प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा:

भाजपाने दार उघडलेले नाही, पण संकेत दिलेत…

काँग्रेसच्या कर्नाटक पॅटर्नवर उद्धव ठाकरेंचं मत काय?

आता नेहरू मेमोरियल नाही; पंतप्रधान मेमोरियल

३० वर्षांनी मुंबईत सापडला लोणावळ्यातील दाम्पत्याचा खुनी

चित्रपटात हनुमानाची भूमिका देवदत्त नागे यांनी साकारली आहे. चित्रपटात क्रिती सेनही आहे. मात्र ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट अडचणीत आला आहे. हिंदू सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून रावण, राम, सीता आणि हनुमानाशी संबंधित काही कथित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी केली आहे. चित्रपटातील दृश्ये रामायणमधील धार्मिक चरित्रांच्या चित्रणापेक्षा वेगळी आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version