२५ आणि २७ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई विद्यापीठ स्टेडियम, मरीन लाईन्स येथे ठाणे जिल्हा ज्युनियर ऍथलेटिक चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अथलेटिक्स प्रशिक्षण योजना (TMCAPY) ने बॉईज, गर्ल्स चॅम्पियनशिप आणि शेवटी एकंदर चॅम्पियनशिप जिंकली. TMCAPY खेळाडूंनी एकूण ३३ सुवर्ण, १३ रौप्य आणि १६ कांस्य पदके जिंकली. TMCAPY खेळाडूंनी ७ नवीन स्पर्धा विक्रम नोंदवले.
१४ वर्षांखालील मुली – राधिका गावडे – ट्रायथलॉन – सुवर्णपदक. श्वेनी कोरगावकर – शॉट पुट – रौप्य पदक. रिसा फर्नांडिस – ६० मीटर – कांस्यपदक. कनुष परब – ट्रायथलॉन – कांस्य पदक.
१६ वर्षांखालील मुली – मिहिका सुर्वे – ३०० मीटर – सुवर्णपदक (NMR) आणि १०० मीटर – रौप्य पदक. श्रेष्ठ शेट्टी – लांब उडी – सुवर्णपदक आणि १०० मीटर – कांस्य पदक. झोया शेख – ३०० मीटर – कांस्यपदक. अदिती पाईकराव – ८०० मीटर – कांस्यपदक. कानन देसाई – लांब उडी – कांस्य पदक. मिहिका सुर्वे, श्रेथा शेट्टी, कानन देसाई आणि झोया शेख – मेडले रिले – सुवर्णपदक.
१८ वर्षांखालील मुली – नतालिया फर्नांडिस – ४०० मीटर अडथळा – सुवर्णपदक. शोभा ढोरे – १५०० मीटर – सुवर्णपदक.
२० वर्षांखालील मुली – इशिका इंगळे – २०० मीटर आणि १०० मीटर अडथळा – सुवर्णपदक. तन्वी आचार्य – १०० मीटर – रौप्य पदक आणि २०० मीटर – कांस्य पदक. चारवी पावसे – शॉटपुट – सुवर्णपदक आणि १०० मीटर – कांस्य पदक. अर्पिता गावडे – ४०० मीटर अडथळा आणि लांब उडी – सुवर्णपदक.
१४ वर्षांखालील मुले – धैर्य सूर्यराव – लांब उडी – सुवर्ण पदक आणि ६० मीटर – रौप्य पदक.
१६वर्षांखालील मुले – अथरव भोईर – १०० मीटर आणि २०० मीटर – सुवर्णपदक (NMR). तनिश चेड्डा – ३००० मीटर रेस वॉक – सुवर्णपदक. गिरिक बंगेरा – ८०० मीटर – सुवर्णपदक. अथरव साळुंखे – ८० मीटर हर्डल्स – रौप्य पदक. तनिश लोटणकर – ८०० मीटर – रौप्य पदक. अथरव भोईर, अथरव साळुंखे, गिरीक बंगेरा आणि तनिश लोटणकर – मेडले रिले – सुवर्णपदक. हर्षल कोरी, मोईज शियाजी, रमण यादव, अथरव म्हात्रे – मेडले रिले – कांस्यपदक.
हे ही वाचा:
सुप्रिया सुळेंना नको आहे महिला आरक्षणाचा लाभ
मार्क झुकेरबर्गने केलं भारताचं कौतुक !
काही देशांच्या संसदेत ५० टक्क्यांहून अधिक महिला
काँग्रेसचा नवा आरोप; राज्यघटनेच्या प्रतीमधून म्हणे समाजवादी-धर्मनिरपेक्ष शब्द गायब
१८ वर्षांखालील मुले – अली शेख – ४०० मीटर अडथळा – सुवर्णपदक आणि १०० मीटर – कांस्यपदक. सोहम सावंत – १०० मीटर आणि २०० मीटर – रौप्य पदक. ऋषभ यादव – ४०० मीटर अडथळा आणि लांब उडी – रौप्य पदक. आदिराज मोकल – ४०० मीटर – रौप्य पदक. शुभम कोळंबे – ८०० मीटर – कांस्यपदक. अथरव म्हात्रे – ४०० मीटर अडथळा – कांस्यपदक. अली शेख, ऋषभ यादव, सोहम सावंत आणि आदिराज मोकल – मेडले रिले – सुवर्णपदक.
२० वर्षांखालील मुले – हर्ष राऊत – १०० मीटर आणि २०० मीटर – सुवर्णपदक (NMR). निखिल ढाके – ४०० मीटर – सुवर्णपदक आणि २०० मीटर – रौप्य पदक. शुभम सोनवणे – १०००० मीटर – सुवर्णपदक. तेजस पाईकराव – १५०० मीटर – सुवर्णपदक. आल्फ्रेड फ्रान्सिस – ४०० मीटर आणि ८०० मीटर – रौप्य पदक. निमेश गावडे – ४०० मीटर – कांस्यपदक.
आमचे बहुतेक खेळाडू वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करू शकले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूने आमच्या यशात हातभार लावला आहे, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी व्यक्त केली.