27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषसीआयएससीई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे मनपा ऍथलेटिक्स योजनेची झेप

सीआयएससीई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे मनपा ऍथलेटिक्स योजनेची झेप

जिंकली ९ सुवर्णपदके

Google News Follow

Related

२१ वी सीआयएससीई (भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद) राष्ट्रीय ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली होती. ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण पदके, २ रौप्य पदके आणि २ कांस्य पदके जिंकून आपली छाप पाडली.

या स्पर्धेत ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या मुलांनी मिळविलेले यश असे –
१४ वर्षांखालील मुले – ध्रुव शिरोडकरने १०० मीटर, २०० मीटर आणि ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळवले. अनिरुद्ध नंबूद्रीने ४०० मीटर, ६०० मीटर आणि ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळवले.
१४ वर्षांखालील मुली – रिसा फर्नांडिसने २०० मीटरमध्ये रौप्यपदक आणि ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळवले.
१७ वर्षांखालील मुली – मिहिका सुर्वेने ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक, २०० मीटरमध्ये कांस्यपदक मिळवले.

१७ वर्षांखालील मुले – धैर्य सूर्यरावने लांब उडीमध्ये कांस्यपदक आणि ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळवले.
१९ वर्षांखालील मुले – तनिश लोटणकरने ४ x ४०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक मिळवले.

हे ही वाचा:

अलौकीक प्रतिभेसमोर नतमस्तक व्हा…

हिजबुल्लाचे मुख्यालय इस्रायलने उडविले, प्रमुख नसरल्लाही मारला गेला?

आसाम आयईडी प्रकरण: एनआयएकडून उल्फा (आय) च्या कार्यकर्त्याला अटक

सेक्युलर फॅब्रिकच्या चिंध्या कुणी केल्या ते पप्पांना विचारा!

तीन सुवर्ण पदके जिंकणारा ध्रुव म्हणाला, “ही माझी पहिली राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे. त्यात सहभागी होण्यासाठी मी खूप उत्साहित होतो पण आज मी ३ सुवर्णपदके जिंकू शकलो, याचा मला खूप आनंद आहे. या प्रवासात मला साथ दिल्याबद्दल मी माझ्या पालकांचे आभार मानू इच्छितो. धैर्य म्हणाला, “मी लांब उडीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. मी यापेक्षा चांगले करू शकलो असतो. आगामी स्पर्धांसाठी मी आणखी मेहनत करेन.”

“सर्व ऍथलीट्स त्यांच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करण्यास सक्षम आहेत हे पाहून चांगले वाटले. त्यामुळे आगामी स्पर्धांसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढेल. सर्व खेळाडूंना पाठिंबा दिल्याबद्दल मी श्रीमती मीनल पालांडे (उप आयुक्त- टीएमसी) यांचेही आभार मानू इच्छितो, असे मत प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी व्यक्त केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा