चंद्रपूर येथे १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र आंतरविद्यापीठ खेळांचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या (TMCAPY) निखिल ढाकेने ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक, २०० मीटरमध्ये कांस्यपदक, ४ x ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक आणि ४ x १०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक मिळवले. हर्ष राऊतने २०० मीटरमध्ये सुवर्णपदक, १०० मीटरमध्ये रौप्यपदक आणि ४ x १०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले.
लीना धुरीने ४०० मीटरमध्ये कांस्यपदक, ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक आणि ४ x ४०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक मिळवले. आदिती पाटीलने ८०० मीटरमध्ये कांस्यपदक, ४ x ४०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक आणि ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले. TMCAPY खेळाडूंनी ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदके जिंकली.
हे ही वाचा:
मराठी उद्योजकांनी निर्यात क्षेत्रातील संधींचा फायदा घ्यावा
माझगाव येथे बेस्टच्या धडकेत ८४ वर्षीय महिला ठार
मुंबईत मागील २४ तासांत १० बांगलादेशी घुसखोरांना अटक
त्रिपुरा येथून तीन भारतीय दलालांसह १३ घुसखोर बांगलादेशींना अटक
या कामगिरीबद्दल हर्ष म्हणाला, “हे माझे राज्य विद्यापीठातील पहिले पदक आहे. माझ्या पालकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.” लीना म्हणाली, “निलेश पाटकर सरांसोबतच्या गेल्या १० महिन्यांच्या प्रशिक्षणात, मी २३ वर्षाखालील राज्य स्पर्धेत आणि आता महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ स्पर्धेत माझे पहिले पदक जिंकले आहे. यामुळे मला आगामी स्पर्धेसाठी कठोर परिश्रम करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.”
“सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. स्प्रिंट स्पर्धेत हर्ष आणि निखिलचे वर्चस्व होते. लीना आणि अदितीमध्ये गेल्या वर्षभरात चांगलीच सुधारणा झाली आहे. ही कामगिरी त्यांना आगामी स्पर्धेसाठी कठोर परिश्रम करण्यास प्रेरित करेल अशी आशा आहे, असे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी सांगितले. अशोक आहेर (योजना प्रमुख), राजेंद्र मयेकर (सहसचिव- TDAA) आणि मीनल पालांडे (उपायुक्त- TMC) यांनी सर्व खेळाडूंचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.