गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी चालकाला अटक!

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी चालकाला अटक!

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी त्यांच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.रणजीत यादव असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.ठाणे गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.रविवारी उल्हासनगर कोर्टात रणजीत यादवला हजर केले असता न्यायालयाकडून त्याला १४ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान, आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले.या गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड,संदीप सरवणकर, हर्षल केणे तसेच विकी गणात्रा याला अटक केली असून गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि नागेश बडेकर हे दोघे अद्याप फरार आहेत.

हे ही वाचा:

दंगलीवेळी ‘त्या’ पाण्याच्या टाकीत पाणी नाही तर दगडे भरली होती

एबी डी व्हिलिअर्सने मागितली विराट कोहली, अनुष्का शर्माची माफी

‘भारत जोडो यात्रे’ला वेळेआधीच विराम मिळण्याची चिन्हे

काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले प्रमोद कृष्णम म्हणाले, राम आणि राष्ट्र याबाबत तडजोड नाही!

या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.तसेच फरार असलेला वैभव गायकवाड हा पोलिसांना शरण येणार असल्याचेही माहिती समोर आली आहे.दरम्यान, गणपत गायकवाड यांचा वाहनचालक रणजीत यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ठाणे क्राईम ब्रँच पोलिसांच्या पथकाने रणजीत यादवला अटक करत उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Exit mobile version