ठाणे महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी मोजावे लागणार ९२ कोटी

ठाणे महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी मोजावे लागणार ९२ कोटी

ठाणे येथील दिवा डम्पिंग ग्राऊंड हलविण्याच्या प्रक्रियेला आता वेग आलेला आहे. मुख्य बाब म्हणजे स्थलांतर करण्यासाठी चक्क ९२ कोटींचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. रेडिरेकनर की बाजारभाव या एका मुद्द्यावर हा व्यवहार सध्या थांबलेला आहे.

महापालिका याकरता जवळील भंडार्ली गावातील चार हेक्टर भूखंडाचा विचार करत आहे. तसेच किमान १० वर्षांसाठी हा भूखंड भाड्यावर मिळायला हवा याकरता आता प्रशासनाने कंबर कसली आहे. रेडी रेकनर दराने पाहिल्यास सध्याच्या घडीला या भूखंडची किंमत सुमारे १२ कोटी होते. परंतु जागा मालकाने बाजार भावाची मागणी केलेली आहे, ही मागणी ९२ कोटींची आहे. महापालिकेकडे जागा विकत घेण्याशिवाय कुठलाही मार्ग शिल्लक नाही.

हे ही वाचा:

आता श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिराची प्रतीक्षा

फेरीवाल्याने सुऱ्याने कापली पालिका सहाय्यक आयुक्तांची तीन बोटे

मराठी माणसाला एकत्र येऊ द्यायचे नाही, म्हणूनच दहीहंडीला विरोध आहे का?

पुन्हा भालाफेकीत भारताला मिळाले सुवर्ण; सुमित अंतिलची जबरदस्त कामगिरी

मुळात ठाणे महापालिकेने अनेक फॅन्सी तसेच हायटेक प्रकल्प आणले. परंतु साधे हक्काचे डम्पिंग ग्राऊंड अजूनही पालिकेला उभारता आले नाही. साधा शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प सुद्धा ठाणे महापालिकेकडे नाही.

दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला कचऱ्याच्या दुर्गंधी सर्वदूर पसरत आहे. यामुळेच दिवावासीयांनी महापौरांसह पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दिव्याचे डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाला हालचाल करावी लागली होती. डिसेंबर, २०२० मध्ये झालेल्या पालिका सभेअंतर्गत पर्यायी भूखंड शोधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळेच आता सध्याच्या घडीला अजून कोणत्याही ठोस प्रक्रियेवर महापालिका प्रशासन अजून आलेले नाही. रेडी रेकनर दराने की बाजारभावाने ही जागा घ्यायची यावरच सध्या महापालिका प्रशासनाचं घोडं अडलं आहे.

Exit mobile version