CISCE (भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षेसाठी परिषद) प्रादेशिक स्तरावरील ऍथलेटिक चॅम्पियनशिप २९ आणि ३० ऑगस्ट रोजी प्रियदर्शनी पार्क, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
१७ वर्षांखालील मुले – धैर्य सूर्यराव – १०० मीटर – कांस्य पदक आणि लांब उडी – रौप्य पदक. तनिश लोटणकर – ८०० मीटर – कांस्यपदक. १७ वर्षांखालील मुली – मिहिका सुर्वे – २०० मीटर – रौप्य पदक; ४०० मीटर – सुवर्णपदक. १४ वर्षांखालील मुले – ध्रुव शिरोडकर – १०० मीटर आणि २०० मीटर – सुवर्णपदक. अनिरुद्ध नंबूद्री – २०० मीटर – कांस्य पदक; ४०० मीटर आणि ६०० मीटर – सुवर्णपदक. १४ वर्षांखालील मुली – रिसा फर्नांडिस – १०० मी – कांस्यपदक, २०० मीटर आणि लांब उडी – रौप्य पदक. ठाणे महानगरपालिका अथलेटिक्स प्रशिक्षण कार्यक्रमाच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण पदके, ४ रौप्य पदके आणि ४ कांस्य पदके जिंकली.
हे ही वाचा:
टायगर मेमनच्या तीन सदनिका केंद्र सरकारच्या ताब्यात
तबेला मालकाच्या खिशात ड्रग्सचे पाकीट टाकताना पोलीस सापडले
पत्राचाळ प्रकरण: फडणवीसांचे नाव घेण्यासाठी दिली होती धमकी
चंपाई सोरेन यांच्यानंतर लोबिन हेमब्रमही भाजपमध्ये दाखल !
यापैकी धैर्य सूर्यराव, मिहिका सुर्वे, ध्रुव शिरोडकर, अनिरुद्ध नंबूद्री आणि रिसा फर्नांडिस या खेळाडूंची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
“त्या सर्वांनी आपापल्या इव्हेंटमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना पाहून चांगले वाटले. हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी धैर्य सूर्यराव, मिहिका सुर्वे, ध्रुव शिरोडकर, अनिरुद्ध नंबूद्री आणि रिसा फर्नांडिस यांची निवड झाली आहे. मला आशा आहे की सर्वजण त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी करतील, असे मत प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी व्यक्त केले.