ठाणे – बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार, दुहेरी बोगदा बांधकामाला मिळणार वेग

प्रकल्पासाठी दोन कंपन्यांनी दाखवले स्वारस्य

ठाणे – बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार, दुहेरी बोगदा बांधकामाला मिळणार वेग

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली ठाणे-बोरिवली दरम्यान दुहेरी बोगदा बांधण्यासाठी दोन पायाभूत सुविधा कंपन्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे कोटेशन दिले आहेत. लार्सन अँड टुब्रो आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड या दोन कंपन्या बोगदा प्रकल्पासाठी मैदानात उतरल्या आहेत. या बोगद्याच्या साठी तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे बोरिवली आणि ठाणे दरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २०१५ मध्ये ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याची योजना आखली होती. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली दुहेरी बोगद्यासह रस्ते बांधणी करण्यात येणार आहे. त्यानुसार आता या प्रकल्पासाठी दोन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. तांत्रिक बाबींची छाननी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बोगद्याच्या आत २३.६८ किमी रस्ते आणि आणखी २ किमी संपर्क रस्ते बांधण्यासाठी सर्वात कमी कोटेशन सादर केलेल्या कंपनी संदर्भात निर्णय घेण्यासाठी आर्थिक बोली उघडली जाईल. संपर्क रस्ता वगळता प्रत्येक बोगद्याची लांबी ११.८४ किमी असेल.

बोरिवलीपासून ५.७५ किमीपर्यंत दुहेरी बोगदे बांधणे आणि ठाण्याच्या टोकापासून प्रत्येकी ६.०९ किमीचे बांधकाम अशा दोन विभागामध्ये हे काम विभागण्यात आलेले आहे. प्रत्येक बोगद्यामध्ये तीन मार्ग असे एकूण सहा मार्ग असतील आणि आपत्कालीन कारणांसाठी एकमेकांशी जोडणारे बोगदे असतील.

हा मूळ रस्ते प्रकल्प ११,०००० हजार कोटी रुपये खर्चाचा आहे. परंतु प्रकल्प अंमलबजावणीतील अडथल्यांमुळे हा खर्च ११,२३५ कोटी रुपयांवरून वाढून कोटींवरून १३,२०० कोटींपर्यंत वाढला गेला असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने या प्रकल्पासाठी आधीच वन्यजीव मंजुरी दिली आहे. दुहेरी बोगदा प्रकल्पाचा भूजलावर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होणार नाही, कारण उर्वरित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आकाराच्या तुलनेत बोगद्याचा आकार “नगण्य” असल्याचा असा निष्कर्ष आयआयटी-बॉम्बे अभ्यासात काढला आहे.

हे ही वाचा:

जेनेरिक आधार स्वस्त औषधांसाठी देशभरात १०,००० मेडिकल स्टोअर उघडणार

मास मीडियाचा कोर्स, पत्रकार, डान्स बार मग घरफोड्या

चिपचा तुटवडा संपला आणि मोटारींचा वाढला वेग.. विक्रीत दणदणीत वाढ

गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीवर युएपीए अंतर्गत कारवाई

प्रवासाचा वेळ फक्त १५ मिनिटांपर्यंत कमी होणार

ठाण्यातील टिकुजिनीवाडी ते पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या बोरिवली टोकाला जोडणाऱ्या ११.८ किमी लांबीच्या या बोगद्याच्या रस्त्यात १०.२५ किमी दुहेरी मार्गाचा बोगदा,१.५५ किमी जंक्शन आणि प्रत्येकी ३+३ लेनचे दोन बोगदे समाविष्ट आहेत, पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे संरेखन बोरिवलीतील मागाठाणे येथील एकता नगर येथे असेल आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडीच्या पुढे असेल . सध्या, रस्त्याने, मागाठाणे ते टिकुजी-नी-वाडी हे २४ किमी अंतर कापण्यासाठी एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो. एकदा हा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या २३ मीटर खाली बांधला गेला की, प्रवासाचा वेळ फक्त १५ मिनिटांपर्यंत कमी होईल.

Exit mobile version