ठाकूर संकुलाला अपुरा पाणीपुरवठा; पालिका अधिकाऱ्यांना रहिवाशांनी घेतले फैलावर

ठाकूर संकुलाला अपुरा पाणीपुरवठा; पालिका अधिकाऱ्यांना रहिवाशांनी घेतले फैलावर

कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुलातील रहिवाशांनी महानगरपालिकेच्या आर साऊथ विभाग कार्यालयात धडक देऊन मनपा अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यामुळे आज मालाडपासून बोरीवली परिसरातील रहिवाशांना मनपाकडून कपातीच्या काळांत उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला.

कांदिवलीतील भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर ह्यांच्याकडे मनपाकडून अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी स्थानिक भाजपा नेते संजय जयस्वाल ह्यांना त्यात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जयस्वाल व ठाकूर संकुलातील रहिवाशांनी मनपा कार्यालयात धडक देत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते आनंद सोंडे व सहाय्यक अभियंते सतोंष संखेंना धारेवर धरले. यावेळी पाण्याच्या समस्येबाबत अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रहिवाशांची कशी कुचंबणा होत आहे, याचे दाखले रहिवाशांनी दिले.

हे ही वाचा:

एलॉन मस्क यांनी केली ही मोठी घोषणा

बसपा नेत्याने अपहरण करून विकल्याचा विद्यार्थीनीचा आरोप

भारतीय रेल्वेने दिले ‘मदर्स डे’ चे खास गिफ्ट

LPG गॅसच्या पोटात दडलंय काय?

 

ह्यावेळी संजय जयस्वाल ह्यांनी ठाकूर संकुलातील जनता गेले चार महिने पाणीकपातीच्या झळा सोसत आहे, असे सांगितले.दररोज तीन हजार रूपये भरून टँकरने पाणी पुरवठ्याची सेवा देणे सोसायट्यांना परवडणारे नाही, तेव्हा मनपाने पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा अशी मागणी या अधिकाऱ्यांपुढे रेटून धरली.

ह्यानंतर संतप्त ठाकूर संकुलातील रहिवाशांनी मनपा अधिकाऱ्यांवर उपप्रश्नांच्या फैरी झाडत त्यांना धारेवर धरले. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मनपा अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर भांडूपहून येणाऱ्या जलवाहिनीऐवजी मालाडहून सकाळी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून कॉम्प्लेक्सवासियांना तात्पुरता पाणीपुरवठा केला जावा व पाण्याच्या वेळात दुपारऐवजी सकाळीच बीएमसीने पाणीपुरवठा करावा, ह्या दोन ठाकूर संकुलातील रहिवाशांच्या मागण्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्यानंतर त्यांची सुटका झाली.

Exit mobile version