कोविड काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची चौकशी करण्यात येत आहे.अनेकांवर कारवाईही करण्यात आली होती.त्यातच आता खिचडी घोटाळा प्रकरणात उद्धव ठाकरेंचे जवळीक मानले जाणारे अमोल किर्तीकर यांचंही नाव जोडले गेले असून त्यांनाही आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
बॉडी बॅग घोटाळा प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र आहेत.खिचडी घोटाळ्यात अमोल कीर्तिकर यांचं नाव आल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. याअगोदर खिचडी घोटाळ्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनेकांची चौकशी सुरु आहे.
हे ही वाचा:
नागपूर विमानतळावर ८७ लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक !
मोदी सरकारच्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठींबा
नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर..
खिचडी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल
आतापर्यंत खिचडी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.