ठाकरे नाक घासून माफी मागा, अन्यथा तीव्र आंदोलन करू!

चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

ठाकरे नाक घासून माफी मागा, अन्यथा तीव्र आंदोलन करू!

कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत उघड केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूर दौऱ्यावर दरम्यान पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

राज्यातील वादग्रस्त ठरत असलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला.राज्यात कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप हे ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांचे म्हणजेच राष्ट्रवादीचे आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे हे पाप महायुती सरकारच्या माथी कशाला हवे? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याबद्दल महायुती सरकारचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे अभिनंदन केले.

हे ही वाचा:

एनडीए कॅडेट सैन्य प्रशिक्षणावेळी जखमी; उपचारादरम्यान मृत्यू

कंत्राटी भरती सुरू केली काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठाने, आरोप मात्र आमच्यावर!

ललित पाटील भावासोबत ड्रग्स फॅक्टरीतून मिळवत होता बक्कळ नफा

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या वाहनचालकाला अटक

मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयावर सही केली. आता तेच कंत्राटी पद्धती देवेंद्र फडणवीस यांनी आणली असे म्हणून दोष देत नौटंकी करीत आहेत. त्यांच्यासारखा खोटारडा मानूस मी पाहिला नाही. कॉंग्रेसचे सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि मविआचे उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती केली. त्याचा पुरावा समोर आला आहे. कंत्राटी भरती हे कॉंग्रेसने केलेले पाप आहे, असे बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरेंसह मविआचे नेते केवळ बोलघेवडे आहेत. महाराष्ट्राच्या जनतेची केलेली फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीररीत्या उघड केली. त्यामुळे त्यांनी उद्या सकाळी ९.३० वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अन्यथा भाजपाचे राज्यभरातील लाखो कार्यकर्ते सकाळी १० वाजता रस्त्यावर उतरतील व आंदोलन करतील. महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या नेत्यांना भाजपा धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

Exit mobile version