भारताची गगनभरारी; ‘गगनयान’ प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी

चाचणी उड्डाणाच्या यशामुळे उर्वरित चाचण्या, मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा

भारताची गगनभरारी; ‘गगनयान’ प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्त्वपूर्ण मानवी अवकाश मोहिमेच्या तयारीसाठीची पहिली चाचणी शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी यशस्वी करण्यात आली. ‘टेस्ट व्हेईकल (टीव्ही-डी१) या एकाच टप्प्यातील इंधन रॉकेटचे प्रक्षेपण आज १० वाजता करण्यात आले. या यशस्वी चाचणीमुळे भारतानं अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला आहे.

सकाळी १० च्या सुमारास इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन गगनयानचं क्रू मॉडेल लाँच करण्यात आलं.  ‘गगनयान’ या भारताच्या मानवी अवकाश मोहिमेत अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री ‘टीव्ही-डी१’मधील ‘क्रू मोड्यूल’द्वारे घेण्यात आली. या चाचणी उड्डाणाच्या यशामुळे उर्वरित चाचण्या आणि मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुरुवातीला सकाळी ८ वाजता प्रक्षेपण होणार होते, मात्र खराब हवामानामुळे प्रक्षेपणाची वेळ बदलून सकाळी ८.४५ करण्यात आली. त्यानंतर इंजिन योग्यरित्या प्रज्वलित झाले नाही. त्यानंतर इस्रोकडून तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आणि १० वाजता यशस्वी उड्डाण करण्यात आले. भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या गगनयान मोहिमेसाठी या चाचण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. गगनयान मोहीम २०२५ मध्ये प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे.

‘टीव्ही-डी१’मध्ये सुधारित विकास इंजिनाचा समावेश केलेला असून त्याच्या पुढील भागात ‘क्रू मोड्यूल’ आणि ‘क्रू एस्केप सिस्टिम’ ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. हे यान३४.९  मीटर उंच आहे आणि त्याचे वजन ४४ टन आहे.

अंतराळवीर ज्या अवकाश यानातून अंतराळात जाणार आहेत त्या यानाच्या आपातकालीन सुटकेची चाचणी आज इस्रोने यशस्वी केली. यामुळे भविष्यात प्रत्यक्ष अतंराळवीर अवकाशात पाठवताना उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाणानंतर काही मिनिटांत तांत्रित बिघाड झाला तर प्रक्षेपकावर-रॉकेटच्या अग्रभागावर असेलल्या अवकाशान यानातील अंतराळवीरांना पुन्हा सुखरुप जमिनीवर आणणे हे शक्य होणार आहे. याबाबची पहिली चाचणी त्या अवकाश यानाच्या माध्यमातून आज करण्यात आली.

हे ही वाचा:

राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ट्रुडो पुन्हा बरळले

फडणवीसांनी बुरखा नव्हे; कपडेच फाडले!

४३ वर्षांनी बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

चंद्रकात पाटील म्हणाले, माझ्या बॅगेत ८ शर्ट!

अपेक्षेप्रमाणे चाचणीसाठी नियोजित केलेले आपातकालीन सुटकेचे सर्व टप्पे हे पुर्ण झाल्याचं यावेळी जाहिर करण्यात आलं आहे. आता गगनयानची आणखी एक चाचणी पुढील काही महिन्यात केली जाणार आहे.

Exit mobile version